Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आता महापालिका कर्मचाऱ्यांची हजेरी फेसरिडिंगद्वारे: कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू : महापालिकेच्या 2737 कर्मचाऱ्यांची हजेरी फेसरीडिंगवर: महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांचा निर्णय

आता महापालिका कर्मचाऱ्यांची हजेरी फेसरिडिंगद्वारे: कर्मचाऱ्यांची नोंदणी सुरू : महापालिकेच्या 2737 कर्मचाऱ्यांची हजेरी फेसरीडिंगवर: महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांचा निर्णय


महापालिका कामकाजात शिस्त निर्माण व्हावी या उद्देशाने महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आदेशाने महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे फेसरीडींग घेतले जात आहे. त्यामुळे आता लवकरच महापालिका कर्मचाऱ्यांची हजेरी फेसरिडिंगवर घेतली जाणार आहे. यासाठी आस्थापना विभाग आणि संगणक विभागाकडून काम सुरु आहे.


महापालिका कर्मचारी वेळेवर कामावर हजर नसतात अशा नागरिक आणि सदस्यांच्या तक्रारी आहेत. बहुतांशी कर्मचारी हे वेळेवर प्रामाणिकपणे कामावर येतात मात्र अनेक कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आशा कर्मचाऱ्यांना वेळेत कामावर येण्याची सवय लागावी आणि कामकाजात गतिमानता यावी यासाठी मनपा आयुक्त नितिन कापडणीस यांनी सर्वच कामगारांची फेस रिडींग द्वारे हजेरी घेण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिले आहेत. यानुसार उपायुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांचे फेसरीडींग नोंदणीचे काम सुरू झाले आहे. यामध्ये एकूण कर्मचारी 2737 असून यामध्ये कायम कर्मचारी 1468, मानधन कर्मचारी 420, स्वच्छता कर्मचारी 499 आणि बदली / संपकालीन कर्मचारी 340 आशा 2737 कर्मचाऱ्यांचे फेसरीडींग घेतले जात आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार असून यानंतर प्रत्येक कर्मचाऱ्याला फेसरिडींगवर आपली हजेरी द्यावी लागणार आहे. यामुळे कर्मचारी वेळेत कामावर येण्यास मदत होणार आहे शिवाय शिस्तही लागणार आहे अशी माहिती आस्थापना अधिकारी अनिल चव्हाण यांनी दिली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.