मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी पुणे आयोजित गुणीजन गौरव परिषद 2021 या संस्थेच्या वतीने विद्यमान नगरसेवक मा. लक्ष्मण भाऊ नवलाई यांना राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी पुणे आयोजित गुणीजन गौरव परिषद 2021 या संस्थेच्या वतीने विद्यमान नगरसेवक मा. लक्ष्मण भाऊ नवलाई यांना राज्यस्तरीय आदर्श कार्य गौरव समाजरत्न पुरस्कार ऑनलाईन पद्धतीने दि. 25 ऑगस्ट 2021 रोजी सायं. 7 वा. प्रदान करणेत आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.अँड. कृष्णाजी जगदाळे व त्यांच्या टीमने 1.5 वर्षांपूर्वी सोशल मीडिया द्वारे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपली माहिती ऑनलाइन द्वारे पाठवावे असे आवाहन केले होते. त्या अनुषंगाने लक्ष्मण भाऊ यांनी सन 1987 पासून ओम गणेश सार्वजनिक गणपती ट्रस्ट (फेटेवाला मानाचा चांदीचा गणपती) यांच्या माध्यमातून सहकार, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आध्यात्मिक व क्रीडा या सर्व क्षेत्रामध्ये केलेल्या दैदिप्यमान कार्याचा सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली होती. ओम गणेश ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने गेली 33 वर्षे आदर्श गणपती उत्सव साजरा केला जातो. त्या निमित्ताने समाजातील युवा- युवती व महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे भव्य असे आयोजन करण्यात येत असते. गणेश उत्सवा बरोबर गणेश जयंती (जन्मकाळ) संकल्पना ट्रस्टने सांगली शहरामध्ये पहिल्यांदा चालू केली त्या निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण सोहळा,भागवत कथा, प्रवचन व हजारो लोकांचे महाप्रसाद अशा आध्यात्मिक कार्यक्रमाद्वारा आरोग्य शिबीर व रक्तदान शिबिरेही सातत्याने घेतली जातात.
ट्रस्टने 2012 साली रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रतिपंढरपूर हा देखावा साकार करून सांगली जिल्ह्यामध्ये मानाचे स्थान पटकावलेले आहे. सांगली मिरज कुपवाड शहर महानगर पालिकेने सदरच्या प्रतिपंढरपूर या देखाव्याला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले होते. ट्रस्टच्या माध्यमातून उपनगरातील महिलांची आवश्यकता पाहून सन 1996 साली ऐतिहासिक अशा गुरुवारच्या आठवडा बाजाराची निर्मिती केली. साधारण 2,000 व्यापारी व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार दिलेला आहे. व परिसरातल्या हजारो नागरिकांना त्याचा फायदा होत आहे. ट्रस्टच्या माध्यमातून प्रतिवर्षीच्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करीत असताना सन 2005 साली दामाणी हायस्कूल येथे हरिपूर येथील भयभीत झालेल्या हजारो पूरग्रस्तांना त्यांना आधार देऊन त्यांचे पालन, पोषण व भोजन अशी उत्कृष्ट व्यवस्था केल्यामुळे तत्कालीन महसूल मंत्री मा. नारायण राणे साहेब व जिल्हाधिकारी म्हैसकर मॅडम यांनी केंद्राची पाहणी करून मन भरून कौतुक केले होते व ओम गणेश ट्रस्टने सहकार महर्षी विष्णुअण्णा पाटील रुग्णवाहिके मार्फत सातत्याने नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मोफत रुग्णसेवा व औषध सेवा करीत आहे. तसेच देहू आळंदी ते पंढरपूर पर्यंत निघणाऱ्या ज्ञानोबा-तुकोबा या वैष्णवांच्या दिंडी सोहळ्यामध्ये मोफत औषधोपचार करण्यात येते. या सर्व केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे MVLA ट्रस्ट पुणे यांनी आदरपूर्वक कार्याचा विचार करून राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न हा पुरस्कार जाहीर केलेला आहे. लक्ष्मण भाऊ नवलाई यांना यापूर्वी बाळासाहेब गलगले सामाजिक विकास मंडळ यांचे कडून आदर्श नगरसेवक हा पुरस्कार व लायन्स क्लब मिरज यांचे वतीने समाजरत्न पुरस्कार तसेच कोरोना महामारी मध्ये आत्मीयतेने कोरोना रुग्णांची सेवा केल्यामुळे लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या वतीने कोरोना योध्दा हा पुरस्कार मिळालेला आहे.लक्ष्मण भाऊ नवलाई हे अखिल भाविक वारकरी मंडळ सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. एका सामान्य कार्यकर्त्याला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे मनपा क्षेत्र व जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य नागरिक, वारकरी संप्रदाय व उद्योजक यांनी समाधान व्यक्त केलेले आहे. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. अशी माहिती ओम गणेश ट्रस्टचे विश्वस्त प्रकाश जाधव यांनी कळविली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.