ई-पीक पाहणी ॲप 20 हजार 503 शेतकऱ्यांनी केली नोंदणी तर 19 हजार 133 शेतकऱ्यांनी केली विविध पीकांची नोंद - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
सांगली, दि. 07, : राज्य शासनाने पिकाच्या नोंदीसाठी ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे. ई-पीक पहाणी ॲप आतापर्यंत 20 हजार 503 शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ॲप डाऊनलोड केलेल्या शेतकऱ्यांपैकी 19 हजार 133 शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील विविध पिकांच्या नोंदी यावर केल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
ई-पीक पाहणी ॲप यामुळे शेतकरी बांधव स्वत: आपल्या सात बाऱ्यावर पिकाची नोंद करु शकणार आहेत. हे मोबाईल ॲप दिनांक 15 ऑगस्ट पासून कार्यरत झाले आहे. आतापर्यंत ई-पीक पाहणी ॲप सर्वाधिक खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाऊनलोड केले आहे. तालुकानिहाय नोंदणी केलेल्या व पीक नोंद केलेल्या शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे –(कंसात ॲपवर पिकांची नोंद केलेले शेतकरी )आटपाडी-2 हजार 873 (2 हजार 727), कडेगाव-2 हजार 461 (2 हजार 227), कवठेमहांकाळ -880 (807), खानापूर -3 हजार 500 (3 हजार 500), जत -1 हजार 218 (1 हजार 137), तासगाव -1 हजार 902 (1 हजार 776), पलूस -1 हजार 454 (1 हजार 343), मिरज -1 हजार 700 (1 हजार 562), वाळवा -3 हजार 212 (2 हजार 999), शिराळा -1 हजार 303 (1 हजार 201), तरी उर्वरित शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करुन आपल्या पिकांची नोंदणी करुन घ्यावी, या ॲपच्या अधिक माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक 020-25712712 असा आहे. यावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.