महापालिकेचे जीपीएम कोविड हॉस्पिटलमध्ये 1091 रुग्णांनी घेतली सेवा : 5 महिन्यात 797 रुग्णांवर यशस्वी उपचार : 31 बाल रुग्णही बरे होऊन घरी परतले: मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली जीपीएम मध्ये रुग्णांना जलद सेवा: पाच महिन्यात एकही मृत्य नाही : जीपीएम 19 सप्टेंबर पासून बंद
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून चालवले जाणारे मिरजेतील जीपीएम कोविड हॉस्पिटलमध्ये आत्तापर्यंत 1091 रुग्णांनी रुग्णसेवा घेतली आहे. मागील 5 महिन्यात 797 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले तर 31 बाल रुग्णही जीपीएममधून बरे होऊन घरी परतले आहेत.
मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली जीपीएम मध्ये रुग्णांना जलद सेवा मिळाल्यामुळे पाच महिन्यात एकही मृत्यू झाले नाहीत. त्यामुळे मिरजेचे जीपीएम कोविड हॉस्पिटल रुग्णांसाठी वरदान ठरले आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी अवघ्या सात दिवसात आदीसागरमध्ये महापालिकेचे पाहिले कोव्हिडं हॉस्पिटल उभारले. यामध्ये 700 हुन अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. पहिल्या लाटेत दुसऱ्या रुग्णसेवेसाठी रुग्णालये अपुरे पडत होती त्यामुळे आयुक्त कापडणीस यांनी धाडसी निर्णय घेत आदीसागरची उभारणी केली होती. याचे राज्यस्तरावर कौतुक सुद्धा झाले. आता दुसऱ्या लाटेमध्ये सुद्धा कोविड रुग्णांची होणारी गैरसोय दूर व्हावी, वेळेवर रुग्णसेवा मिळावी यासाठी आदीसागरच्या धर्तीवर आयुक्त कापडणीस यांनी कोणत्याही खर्चाविना
मिरजेत जीपीएम मध्ये महापालिकेचे कोव्हिडं हॉस्पिटल आणि सीसीसी सुरू केले. यामध्ये ऑक्सिजन सेवाही देण्यात आल्याने रुग्णांना मोठा दिलासा आणि आधार मिळाला. मागील पाच महिन्यात जीपीएममध्ये एकूण 1091 रुग्ण दाखल झाले होते. यापैकी 797 रुग्णांवर जीपीएम मध्ये यशस्वी उपचार करण्यात आले तर 294 रुग्णांना अन्य रुग्णालयात स्थलांतरित करण्यात आले. यामध्ये 31 बाल रुग्णही होते. या बाल रुग्णांवर सुद्धा यशस्वी उपचार करून त्यांना कोव्हीडीमुक्त करून घरी पाठवण्यात महापालिका प्रशासनाला यश आले. विशेष म्हणून आदीसागर असो किंवा जीपीएम यामध्ये एकही मृत्यू झाला नाही. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पहिल्या
दिवसापासून जीपीएमवर विशेष लक्ष दिले होते. त्यामुळे कोणत्याही रुग्णाला कोणत्याही प्रकारची अडचण भासली नाही. यामुळे आदीसागर प्रमाणे दुसऱ्या लाटेत जीपीएम हे कोरोना रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. 19 सप्टेंबर पासून जीपीएम कोव्हिडं हॉस्पिटल बंद करण्यात आले आहे.
परिस्थिती उद्भवल्यास त्या ठिकाणी पुन्हा कोव्हिडं हॉस्पिटल सुरू करू: मनपा आयुक्त नितीन कापडणीस सध्या रुग्णसंख्या घटल्याने जीपीएमचे कोव्हिडं हॉस्पिटल बंद केले आहे मात्र भविष्यात कोरोनाची परिस्थिती उद्भवल्यास त्याच ठिकाणी पुन्हा कोव्हिडं हॉस्पिटल सुरू करण्यात येईल , अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.