अटकेच्या कारवाईनंतर नारायण राणेंना अमित शहांचा फोन, काय झाली दोघांत चर्चा?
मुंबई, 26 ऑगस्ट : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आहेपार्ह विधान केल्याने नारायण राणे अडचणीत आले. या आक्षेपार्ह विधानावरुन नारायण राणेंना अटक होऊन नंतर जामीनावर सुटका सुद्धा झाली. नारायण राणेंवर करण्यात आलेल्या या कारवाईनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राणेंना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना फोन केला. दोन्ही नेत्यांमध्ये 24 ऑगस्ट रोजी फोनवरुन संभाषण झाले. अमित शहा यांनी माझी विचारपूस केली होती.
मात्र तुर्तास त्यानंतर आमच संभाषण झाल नाही जनआसीर्वाद यात्रा वेळापत्रकानुसारच सुरू होईल असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती लवकरच होणार? "आम्ही त्यांच्या वक्तव्याच्या पाठीशी नाही पण राणेंच्या पाठीशी आहोत" - देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर भाजपने नारायण राणेंच्या पाठी उभं राहत त्यांना समर्थन दिलं. या संदर्भात दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात नारायण राणे यांनी जे काही वक्तव्य केलं त्यातून एक वाद उभा राहिला.
मला असं वाटतं की, बोलण्याच्या भरात नारायण राणे तसं बोलले असतील. तसं बोलण्याचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री हे पद फार महत्त्वाचं आहे. त्या पदाबद्दल बोलत असताना संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. नारायण राणेंच्या भेटीला पोहोचले रिपब्लिकन पक्षाचे नेते, भेट घेऊन दिला हा सल्ला त्या वक्तव्याचं समर्थन नाही पण... महाराष्ट्राचे मुख्मयंत्री स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव विसरतात याुळे कोणाच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो. त्याचा वेगळ्या प्रकारे निषेध केला जाऊ शकतो हे सांगत असताना त्यावर सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्याचं बिलकूल समर्थन केलं जाऊ शकत नाही. एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो की, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नाही पण भाजप पूर्णपणे नारायण राणेंच्या पाठिशी आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.