Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रौप्य पदक जिंकल्यानंतरही पैलवान रवीवर मोदीजी नाराज

 रौप्य पदक जिंकल्यानंतरही पैलवान रवीवर मोदीजी नाराज


नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंनी यंदा ऑलिम्पिक  खेळांमध्ये अप्रतिम कामगिरी करत सात पदक मिळवली. भारताच्या महिलांसह पुरुषांनी उत्कृष्ट कामगिरी करत इतिसाह रचला. या कामगिरीनंतर भारतीय खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यांच्यावर बक्षिसांचा पाऊस पडत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ऑलिम्पिकमधील सर्व सहभागी खेळाडूंना लाल किल्ल्यावरील ध्वजारोहण कार्यक्रमासाठी आमंत्रित करत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी खेळाडूंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. तर कुस्तीत भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या पैलवान रवीकुमार दहियाकडे मात्र मोदींनी एक तक्रार केली.

रवीशी बोलताना मोदीजी त्याला म्हणाले, 'मला ऑलिम्पिकमध्ये तुझी एक गोष्ट पटली नाही, त्याचीच तक्रार मी तुझ्याकडे करणार आहे.' त्यानंतर रवीने त्यांना काय तक्रार आहे? असे विचारताच उत्तरात मोदीजी म्हणाले, 'तू हरियाणाचा आहेस आणि मी आतापर्यंत पाहिले आहे त्यानुसार हरियाणावासी प्रत्येक गोष्टीत आपला आनंद शोधतात. पण तू ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतरही पोडियमवर खुश दिसत नव्हतास.' मोदींजीच्या या तक्रारीनंतर रवीकुमारलाही हसू आले. ज्यानंतर त्याने यापुढे मी हसत राहिन असं वचन मोदीजींना दिलं. रवीसह मोदींजीनी इतर खेळाडूंशीही संवाद साधला. यावेळी महिला पैलवान विनेश फोगाटने देखील पॅरीस ऑलिम्पिक 2024 मध्ये नक्कीच पदक जिंकेन असा विश्वास मोदीजींना दिला.


 सिंधूला दिलेला शब्द पाळला

पंतप्रधानांन नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिकला जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंशी संवाद साधला होता. यावेळी खेळाडूंच्या घरची परिस्थिती ते त्यांचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास अशा अनेक मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. त्याचवेळी आघाडीची टेनिसपटू पीव्ही सिंधूला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर आपण सोबत आईस्क्रीम खाऊ असं वचन दिलं होतं. दरम्यान सिंधूने सेमीफायनलमध्ये पराभवानंतरही तिसऱ्या स्थानाचा सामना जिंकत कांस्य पदकावर नाव कोरलं. ज्यानंतर मोदींनी दिलेलं वचन पाळत तिच्यासोबत स्वांतत्र्य दिनादिवशी आईस्क्रिम खाललं.

भारताला एकूण सात पदकं

टोक्योमध्ये भारताला एकूण सात पदकं मिळवण्यात यश आलं. या सात पदकांत भालाफेक खेळात नीरज चोप्राला सुवर्णपदक, वेटलिफ्टर मिराबाई चानू आणि पैलवान रवी दहियाला रौप्य पदक मिळालं. तर बॅडमिंटपटू पीव्ही सिंधू आणि पैलवान बजरंग पूनियासह बॉक्सर लवलीना बोरगोहेनला कांस्य पदक मिळालं. याशिवाय सांघिक खेळात भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकावर नाव कोरलं.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.