Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हयांचे नेते मा. विशाल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विश्र्वशांती चषक ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा

सांगली जिल्हयांचे नेते  मा. विशाल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विश्र्वशांती चषक ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धा 


सांगलीच्या विश्वशांती कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचेवतीने वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.विशाल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वशांती चषक खुल्या व मोफत बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. ही स्पर्धा शुक्रवार दि.13 ऑगस्ट रोजी अरेना पद्धतीने होणार असून पहिल्या फेरीस संध्याकाळी 6:3० वाजता सुरुवात होईल. प्रत्येक खेळाडूला 3 मि +2 सेकंद अशी वेळ देण्यात आली आहे.

 तसेच ब्लिडझ प्रकारानुसार या स्पर्धेचे आयोजन होईल अशी माहिती माजी नगरसेवक  श्री. उदय पवार यांनी दिली.

 स्थानिक बुद्धिबळ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंशी खेळण्याची संधी मिळावी हा या स्पर्धेचा मुख्य हेतू असल्याचे  सांगितले. 

या स्पर्धेकरीता रोख्  पारितोषिके  विविध गटांत एकूण 62 पारितोषिके दिली जाणार आहेत. खुल्या गटात प्रथम पारितोषिक रू.1000/-असून 20 पारितोषिके . 8,12,16,  मानांकित व बिगरमानांकिताना प्रत्येकी 3 पारितोषिके तसेच सांगली जिल्ह्यातील 10 खेळाडूना रोख व मेडल अशी  पारितोषिके दिली जाणार आहे 

या स्पर्धा कोणतीही प्रवेश फी नाही 

तसेच  जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन आपले कौशल्य सिद्ध करावे असे आवाहन  विश्वशान्ति क्रिडा मंडळाचे सचिव श्री.इचलकरंजे यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी मुख्य पंच पौर्णिमा उपळावीकर - माने ,

तांत्रिक पंच म्हणून फिडे पंच  दीपक वायचळ, शार्दूल तपासे , केपीएस केस अॅकॅडमीचे प्रशिक्षक श्री.विजयकुमार माने काम पाहणार आहेत. या स्पर्धेचा उद्घाटन  समारंभ सांगलीचे प्रख्यात (GNJ) जोग ज्वेलर्सचे सर्वेसर्वा मा.बाबूराव जोग.  

जिल्हा परिषद सांगलीचे माजी उपाध्यक्ष मा.बबनराव बिरनाळे.

पीव्हीपीआयटी (बुधगाव) चे  गव्हर्निंग कौन्सिल चेअरमन  मा. प्रतापसिंह राजपूत. पीव्हीपीआयटीचे सचिव    मा.आदिनाथ मगदूम यांच्या हस्ते शुक्रवार दि.13 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता विश्वशांती क्रीडा मंडळाचे सभागृहात होणार आहे. या स्पर्धेकरीता नूतन बुध्दिबळ मंडळाचे सहकार्य लाभणार आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.