ठाकरे-राणे वादात अमृता फडणवीस यांची उडी; मुख्यमंत्र्यांवर अप्रत्यक्ष टीका
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं होतं. या कारवाई प्रकरणी भाजपच्या अनेक नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली आणि कारवाईचा निषेधही केला. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केली.
“जेव्हा कोणतीही व्यक्ती स्वत:ला राजा दाखवण्यासाठी धडपडत असते तेव्हा तो खरा राजा नसतो,” अशा शब्दांत अमृचा फडणवीस यांनी टीकेचे बाण सोडले आहेत. महाविकास आघाडीवर यापूर्वीही अमृता फडणवीस यांनी सातत्यानं टीका केली आहे. नारायण राणे यांच्यावरील कारवाईनंतर भाजपचे अनेत नेतेही आक्रमक होताना दिसत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेवर निशाणा साधला होता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.