राहुल गांधींना लोकसभेतून वर्षभरासाठी सस्पेंड करा
नवी दिल्ली : राज्यसभेमध्ये बुधवारी महिला खासदारांना मारहाण झाल्याचा गंभीर आरोप विरोध पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. बाहेरून आलेल्या ४० महिला व पुरुषांनी राज्यसभेमध्ये घुसून महिला खासदारांना मारहाण केली. या घटनेने सध्या देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. तर या घटनेवरून विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला कारणीभूत ठरवले आहे.विरोधी पक्षाकडून या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे.
या घटनेवरून आता रिपाईचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करा अशी मागणी केली आहे.
ते पत्रकारांशी बोलतांना म्हणाले,'राहुल गांधीही चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. यासाठी त्यांना वर्षभरासाठी सभागृहातून निलंबित केले पाहिजे. संसदेत जे घडले ते चुकीचेच आहे. विरोधकांनी सातत्याने गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. मात्र अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात अनेकदा चर्चा करण्याचा प्रयत्न केला.'
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.