Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

स्वत:चा प्रवास लिहून ठेवणं महत्वाचं मान्यवरांचे मत; नायक पुस्तक प्रकाशन

स्वत:चा प्रवास लिहून ठेवणं महत्वाचं मान्यवरांचे मत; नायक पुस्तक प्रकाशन



सांगली: प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं. अनेक वर्षांचे कष्ट, मेहनत, जनसंपर्क यामुळं ते यशस्वी होत असतं. हा जीवनाचा प्रवास इतरांसाठी खुप मार्गदर्शक ठरु शकतो, यासाठी प्रत्येकानं आपला हा प्रवास लिहून ठेवलाच पाहिजे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

भारती विद्यापीठाचे निवृत्त विभागीय संचालक डॉ. नितीन नायक यांच्या जीवनप्रवासावरील नायक या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सतिश परांजपे, शेखर दांडेकर, आर्किटेक प्रमोद चौगुले, नंदू गुरव यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी ही भुमिका मांडली. 

स्वागत प्रमोद चौगुले यांनी केले. डॉ. नायक यांनी यावेळी आपल्या काही आठवणी आणि त्यासोबत ते करीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. डॉ. परांजपे यांनी मनोगत व्यक्त केले. दांडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. पी.वाय.मद्वाण्णा, डीन डॉ. शहाजी देशमुख, डॉ. साक्षी पाटील, प्राचार्या पल्लवी जामसंडेकर, आभाळमाया-आमराई क्लब-रोटरी क्लब-भारती विद्यापीठ-भारती बँक आदी संस्थांचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.