Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

किरीट सोमय्या यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगड व शाई फेक

 किरीट सोमय्या यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगड व शाई फेक





वाशिम : शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या बालाजी पार्टीकल बोर्ड कारखान्यावर १०० कोटींच्या घोटाळ्याचे किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. आज याची पाहणी करण्याकरिता स्वतः किरीट सोमय्या या ठिकाणी येणार होते. या सर्वांची खबर भावना गवळी समर्थकांना लागली आणि सकाळपासून मोर्चेबांधणी केली. यादरम्यान पोलिसांचा मोठा फौजफाटा या परिसरात तैनात करण्यात आला होता.

यातच भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा ताफा वाशिममध्ये दाखल झाला. तेव्हा भावना गवळी यांच्या समर्थकांनी किरीट सोम्ययांना काळे झेंडे दाखवत त्यांच्या ताफ्यावर शाई आणि दगड फेक केली. यानंतर किरीट सोमय्या हे या ठिकाणी न थांबताच निघून गेले. पोलिसांना मात्र परिस्थती नियंत्रणात आणण्याकरिता सौम्य लाठी चार्ज करावा लागला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.