Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

संजय राऊतांची टोलेबाजी; माझ्या काही वाचनात आलं नाही, तो अतिशय स्थानिक प्रश्न"

 संजय राऊतांची टोलेबाजी; माझ्या काही वाचनात आलं नाही, तो अतिशय स्थानिक प्रश्न"


मुंबई: केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईतून सुरू झाली. यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडलेल्या पाहायला मिळाल्या. नारायण राणे यांनी दादर येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. यानंतर शिवसैनिकांनी त्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केल्याचे सांगितले जात आहे. यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे. तो स्थानिक प्रश्न आहे, स्थानिक नेते त्यावर बोलतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर स्वातंत्र्यवीर स्मारक आणि इंदू मिल येथेही भेट दिली होती. यानंतर ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. याबाबत पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, संजय राऊत यांनी याला बगल दिल्याचे पाहायला मिळाले.माझ्या काही वाचनात आले नाही

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आले असता, नाही माझ्या काही वाचनात आले नाही, असे सांगितले. पुढे पत्रकारांनी त्यांना घडलेल्या घटनांचा संदर्भ देत पुन्हा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना राऊत यांनी, आमचे शाखा प्रमुख, नगरसेवक, आमदार यावर बोलतील. हा स्थानिक प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.


नारायण राणेंचा पलटवार

कोण नारायण राणे? यावर मला माहित नाही. आमचे शाखा प्रमुख किंवा आमदार यावर बोलतील. अतिशय स्थानिक विषय हा आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केल्यानंतर यासंदर्भात पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांनी नारायण राणेंना विचारणा करण्यात आली, तेव्हा मी ओळख करुन देईन, जवळ बोलवेन आणि ओळख करुन देईन असा पलटवार नारायण राणे यांनी केला आहे.

दरम्यान, ज्यांना गोमूत्र शिंपडायचे आहे, त्यांना शिंपडून द्या. ते स्मारक दलदलित आहे. फोटो पण साहेबांचा नीट दिसत नाही. आधी स्वतःचे मन शुद्ध करा. येऊ देणार नाही असे म्हटले पण आम्ही गेलो तेव्हा तिथे कुणीच नव्हते. मी जर त्यांचा पुत्र असतो, तर येऊच दिले नसते. आणि शुद्धीकरण करायला ब्राह्मण लागतात ते कुठे होते? आम्हाला सांगा आमच्याकडे ब्राह्मण आहेत, आम्ही दिले असते, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.