Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महापूर आणि कोरोनाच्या काळात मोठ्याप्रमाणात मदत कार्य

महापूर आणि कोरोनाच्या काळात मोठ्याप्रमाणात मदत कार्य



महापूर आणि कोरोनाच्या काळात मोठ्याप्रमाणात मदत कार्य, अन्नछत्र इत्यादी उपक्रम राबवणाऱ्या, सारथी फौंडेशन ने स्वातंत्र्य दीना निमित्त एक आदर्श उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते, त्यासाठी सर्वच सामाजिक स्तरातून उत्तम प्रतिसाद लाभला, या कार्यक्रमाच्या उडघटनासाठी कर्नल एस के बाबू,  सुभेदार मेजर मोहन सूर्यवंशी, आणि नायब सुभेदार विनोद कुमार, 16 महाराष्ट्र बटालियन एन सी सी सांगली, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यांनी उपस्थित तरुण तरुणींना राष्ट्रभक्ती, परंपरा आणि संस्कृतीचा अभिमान आणि शक्तीच्या आधिष्ठाना विषयी मार्गदर्शन केले, त्याना ऐकण्यासाठी आणि या आर्मी ऑफिसरांबरोबर फोटो काढून घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती.

सारथी फौंडेशनच्या सर्वच सामाजिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले, स्वयंसेवकाशी मनसोक्त गप्पा मारल्या.

कार्यक्रमाच्या नियोजनात संतोष कांबळे, जयहिंद गवाणकर, सचिन टाकळे, सचिन माळी, जोहेब मुल्ला, त्याचबरोबर  स्वाती, प्रज्ञा, ज्योती, मनस्वी, ऋतू, शालन,  स्वप्नाली, सायली, सोनाली महिला सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.