योगी आदित्यनाथ यांच्या 'बेलगाम घोडा' वक्तव्यावर काँग्रेसचा निशाणा
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोशल मिडिया म्हणजे 'बेलगाम घोडा' असल्याचे म्हटले आहे. याचवेळी त्यांनी, याला लगाम घालण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासंदर्भातही भाष्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निशाणा साधला असून उत्तर प्रदेशला 'बेलगाम प्रदेश' असे म्हटले आहे.
सिब्बल म्हणाले, "योगी आदित्यनाथ यांनी सोशल मिडियाला बेलगाम घोडा, असे म्हटले आहे. याला आळा घालण्यासाठी त्यांनी "प्रशिक्षण आणि तयारी" करायला सांगितले आहे. भारतात कोणते राज्य "बेलगाम प्रदेश" आहे? ट्रेन करा आणि याला लगाम घालण्याची तयारी करा.''
काय म्हणाले होते योगी आदित्यनाथ -
लखनौ येथे आयोजित करण्यात आलेल्या सोशल मिडिया वर्कशॉपमध्ये योगी आदित्यनाथ यांनी भाजप आयटी सेलचे कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्याशी साधला. यावेळी ते म्हणाले, सोशल मीडिया हा एक बेलगाम घोडा आहे, त्यामुळे यावरही लढाई लढण्यासाठी प्रत्येकाला तयार राहावे लागेल. एवढेच नाही तर, यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सतर्क राहायला सांगितले आहे. जर ते सतर्क राहिले नाही, तर प्रेसचे लोक त्यांना मिडिया ट्रायल्सचा बळी बनवू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री योगी म्हणाले, टीव्ही चॅनेल्स आणि वृत्तपत्र चालविणारे लोक औद्योगिक घराण्यांचे आहेत. पण सोशल मीडियालाला कुणीही माय-बाप नाही. टीव्ही आणि वर्तमानपत्रांमधील गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक आहेत. परंतु सोशल मिडियावर अशी कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे, अशा बेलगाम घोड्याला नियंत्रित करण्यासाठी आपल्याकडे तशा प्रकारचे प्रशिक्षण आणि तशा प्रकारची तयारी असणे आवश्यक आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.