Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे सांगलीत पूरग्रस्तांना मदत

 प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे  सांगलीत पूरग्रस्तांना मदत


सांगली, दि. १४ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने सांगली शहर आणि ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री. चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंच्या किटसचे वाटप करण्यात आले.

पहिल्या दिवशी शहरातील केंगार गल्ली, सांगलीवाडी,  अंकली फाटा येथे किट वाटप करण्यात आले. उर्वरित भागातही त्याचे वाटप सुरू झाले आहे.

यावेळी बोलताना श्री. हंडोरे म्हणाले, प्रत्येक आपत्तीच्यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी पूरग्रस्तांच्या मदतीला धावली आहे. यावेळीही प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात आवश्यक ती मदत पुरवण्यात आली. पुराच्या काळात कार्यकर्त्यांनी खूप चांगले मदतकार्य केले आहे .


यावेळी प्रा. नेमिनाथ बिरनाळे, सिद्धार्थ माने, विजय आवळे, शुभम बनसोडे, सिद्धार्थ कुदळे, सनी धोतरे, शशिकांत बनसोडे, एन. के. कांबळे, सदाशिव खाडे, सचिन घेवारे, अल्ताफ पेंढारी, राजेंद्र कांबळे, प्रशांत ऐवळे, आशिष चौधरी, नंदाताई कोलप उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.