Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

नेत्रदान चळवळ वाढीस लागण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे

 नेत्रदान चळवळ वाढीस लागण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे


सांगली, दि. 25,  : राज्यात दरवर्षी 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर अखेर नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात येतो. नेत्रदान व नेत्रसंकलन होत आहे, मात्र तुलनेत रूग्णांकडून मागणी अधिक आहे. नेत्रदानाची चळवळ समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. नेत्रदान पंधरवड्याचा मुख्य उद्देश बुब्बुळाची मागणी व पुरवठा यामधील तफावत भरून काढणे असा आहे. जिल्ह्यात नेत्रदान चळवळ वाढीस लागण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी व्यक्त केले.

नेत्रदान पंधरवडा निमित्त पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे आयोजित पोस्टर प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील, बालरोगतज्ञ डॉ. सतिश आष्टेकर, दंतरोगतज्ञ डॉ. मनोज पवार, नेत्ररोगतज्ञ डॉ. अर्चना पाटणकर, जिल्हा नोडल अधिकारी (अंधत्व नियंत्रण) जे. जी. बाबर, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रमोद चौधरी, जिल्हा नेत्रदान समुपदेशक अविनाश शिंदे, अभिनंदन पाटील तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक डॉ. संजय पाटील म्हणाले, कोणत्याही वयोगटातील व्यक्ती नेत्रदान करू शकते. नेत्रदानाचा संकल्प केला नसला तरी नेत्रदान करता येवू शकते. मात्र व्यक्तीच्या निधनानंतर नेत्रदान 4 ते 6 तासांमध्ये करावे लागते. याबाबत नजीकच्या नेत्रपेढीला सूचना द्यावी लागते. त्यानंतर नेत्रतज्ञ येवून पारदर्शक पटक किंवा डोळा काढून घेतात. नेत्रदान करताना मृतदेहाला विदृपता येणार नाही याची आर्वजून दखल घेतली जाते. पण कर्करोग, एड्सचे रूग्ण, काविळचे रूग्ण, कोरोनाने मृत झालेले रूग्ण तसेच डोळ्यांना जंतूसंसर्ग झालेल्या रूग्णांना नेत्रदान करता येत नाही.

सांगली जिल्ह्यात नयनतारा नेत्रपेढी सांगली, नेत्रसेवा फाऊंडेशन सांगली, नंदादीप नेत्रपेढी सांगली, भारती हॉस्पीटल व रूग्णालय सांगली, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय बुब्बुळ संकलन केंद्र, श्री. टेके आय क्लिनिक ॲन्ड साईट सी केअर सोसायटी सांगली, शांती सरोज नेत्रालय बुब्बुळ प्रत्यारोपण केंद्र मिरज, शिवदृष्टी बुब्बुळ प्रत्यारोपण केंद्र मिरज, पारसमल कोचेटा आय बँक मिरज, सेवासदन बुब्बुळ प्रत्यारोपण केंद्र मिरज, सुदर्शन नेत्रालय बुब्बुळ प्रत्यारोपण केंद्र इतकी नेत्रपेढी/नेत्रसंकलन केंद्र/बुब्बुळ प्रत्यारोपण केंद्रे कार्यरत आहेत. कोरोना महामारीमध्ये देखील सांगली जिल्ह्यात सन 2021-22 मध्ये माहे जुलै 2021 अखेर एकूण 44 नेत्रबुब्बुळे गोळा करण्यात आली व त्यापैकी 28 नेत्रबुब्बुळांचे प्रत्यारोपण करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.