Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अन्न व औषध प्रशासनच्या कारवाईत ४१ हजारांचे पदार्थ जप्त. - सहायक आयुक्त (अन्न) सु.आ.चौगुले

 अन्न व औषध प्रशासनच्या  कारवाईत  ४१ हजारांचे पदार्थ जप्त. - सहायक आयुक्त (अन्न) सु.आ.चौगुले



सांगली, दि. २०,  : अन्न औषध प्रशासन सांगली विभागाकडून दिनांक १३ ऑगस्ट रोजी भेसळीच्या संशयावरून करण्याचत आलेल्या  कारवाईत सुमारे ४१ हजार रूपयांचे पदार्थ जप्त  करण्यारत आले असल्या्ची माहिती अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सु.आ. चौगुले यांनी दिली. 

   तळेवाडी ता. आटपाडी येथील जनसेवा दुध संकलन केंद्र, या डेअरीवर छापा टाकून म्है‍स गाय दुध या अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित ३ हजार १२५ रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच पेढीमध्येस दुधात भेसळ करण्यापसाठी व्हे् पावडर व रि.पाम कर्नेल ऑईल यांचा साठा ठेवल्यााचे आढळून आल्यासने सदर पदार्थाचे नमुने तपासणीसाठी घेवून उर्वरित ३८ हजार २०० रूपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला व गाय दुध व म्हैास दुधाचा साठा नष्ठउ करण्या त आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी श्रीम.पवार, केदार व नमुना सहायक कवळे यांनी केली आहे. वरील सर्व अन्न पदार्थाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानतंर त्यावर पुढील कारवाई घेण्यात येणार आहे. ग्राहकांना अन्नअ पदार्थाच्याय गुणवत्ते  विषयी काही तक्रार असल्यारस अन्न औषध प्रशासन कार्यालयाकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त सु.आ. चौगुले यांनी केले आहे


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.