ॲड.अमित शिंदे यांचा कार्यकर्त्यांसहित राष्ट्रवादीत प्रवेश... पालकमंत्री नामदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश...
सांगली दि.१६: सांगली जिल्हा सुधार समितीचे संस्थापक व अध्यक्ष ॲड.अमित शिंदे यांनी पालकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनादिवशी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्या सोबत समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या शहर कार्यलयामध्ये झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष मा. सुरेश अण्णा पाटील, ज्येष्ठ नेते मा.पद्माकर जगदाळे, युवक जिल्हाध्यक्ष मा. राहुल पवार, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या उपस्थित अमित शिंदे यांनी कार्यकर्त्यांसहित प्रवेश केला.
यावेळी ना. जयंत पाटील यांनी सर्वांचे पक्षामध्ये स्वागत करत सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये शहराच्या विकासाच्या अनुषंगाने काम करण्यासाठी व पक्षाचे काम मोठया ताकतीने जनतेमध्ये पोहचविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज म्हणाले की, अमित शिंदे सारख्या होतकरू तरुणाच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्ण ताकत उभी करू. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा काम करणाऱ्याला संधी देणारा पक्ष आहे.
महापौर दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले की, अमित शिंदे व सहकाऱ्यांनी महापालिका क्षेत्रांत आपल्या कामाने मोठा ठसा उमटवला आहे. पक्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजकारण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
यावेळी बोलताना ॲड.अमित शिंदे म्हणाले, गेली अनेक वर्ष सामाजिक राजकीय प्रश्नांवर चळवळ केली. अनेक प्रश्नांना वाचा फोडली. अनेक प्रश्न मार्गी लावले. समाजाभिमुख कामाची आवड असणाऱ्या तरुणांचे व ज्येष्ठांचे संघटन देखीले उभारले. परंतु विकासात्मक व रचनात्मक काम करण्यासाठी पक्षीय पाठबळाची आवश्यकता आहे याची सातत्याने जाणीव होत गेली. त्यामुळेच पूर्ण विचार करून, चळवळीतून उभारणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देणारे, विकासाची दूरदृष्टी असणारे व राज्यातील महत्वाचे नेते असणारे पालक मंत्री आदरणीय जयंत रावजी पाटील साहेब यांचे नेतृत्व स्वीकारून काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
यावेळी मा. सुरेश अण्णा पाटील म्हणाले, पवार साहेब व राष्ट्रवादी पक्षाच्या ध्येयधोरणांना धरून राजकारणातून समाजकारण करण्यासाठी कार्यरत राहा. ज्येष्ठ नेते मा.पद्माकर जगदाळे यांनी सर्वांचे स्वागत व पक्षातर्फे आभार मानले.
यावेळी रविंद्र काळोखे, सुभाष तोडकर, जयंत जाधव, महालिंग हेगडे, अभिषेक खोत, आदित्य नाईक, गोरख पाटील, नितीन मिरजकर, प्रशांत साळुंखे, दत्ता पाटील, अमित पाटील, संतोष शिंदे, अल्ताफ पटेल, तेजस नांद्रेकर, अजित पवार, सागर माळी, नितीन मोरे, चंद्रकांत जाधव अशा एकूण ९६ कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.