भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे सर्वसमावेशक नेतृत्व : आ. सुधीरदादा गाडगीळ
सांगली दिनांक १६ ऑगस्ट : भारताचे माजी पंतप्रधान व भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयात साजरी करण्यात आली. “अटलबिहारी वाजपेयी यांचा पंतप्रधान पदाचा कालावधी हा देशाच्या विकासासाठी महत्वाचा होता. अणुस्फोट, कारगिल युद्ध असे अनेक अडचणींचे मुद्दे केंद्र सरकार समोर होते आणि २७ घटक पक्षांना बरोबर घेवून या प्रश्नांना सामोरे जावयाचे होते. पण अटलजींचे नेतृत्व सर्वसमावेशक होते. भिन्न विचारांच्या लोकांशी विचार विनिमय करून ते निर्णय घेत असत. त्यामुळे पंतप्रधान पदाची त्यांची कारकीर्द यशस्वी ठरली. असे विचार आ. सुधीरदादा गाडगीळ यांनी व्यक्त केले. भारतरत्न कै. अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीदिनानिमित्य ते बोलत होते.
आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या कार्यालयात अटलजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार समर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी संघटन सरचिटणीस दीपक माने, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, ज्येष्ठ नेते प्रकाशतात्या बिरजे, श्रीकांततात्या शिंदे, प्रवक्ते मुन्नाभाई कुरणे, अजित वाझे, गणपती साळुंखे आदि पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.