Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाने प्रा.एन.डी.बिरनाळे यांचा सत्कार केला..!!

सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाने प्रा.एन.डी.बिरनाळे यांचा सत्कार केला..!!.


सांगली दि. २९:
महाराष्ट्र प्रदेश शिक्षक काँग्रेसचे उपाध्यक्ष व सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे जाँईट सेक्रेटरी प्रा. एन. डी. बिरनाळे यांना नुकताच महाराष्ट्र राज्य बहुजन अधिकारी व कर्मचारी महासंघांने त्यांना '' शिव, शाहू, फुले, आंबेडकर समाजभूषण हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले त्याबद्दल आज त्यांचा सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे वतीने सत्कार करण्यात आला. गेली तीन दशके प्रा. एन. डी. बिरनाळे यांनी शिव, शाहू, फुले व आंबेडकरी विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी हजारो व्याख्याने दिली आहेत. संविधान संरक्षण व सन्मानाचे काम ते सतत करतात. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या कामात त्यांचे चांगले योगदान आहे. शिक्षक नेता म्हणून महाराष्ट्रभर त्यांचे काम सुरू आहे. हे काम अधिक जोमाने चालत राहण्यासाठी त्यांचा सन्मान करीत असल्याचे रावसाहेब पाटील म्हणाले. यावेळी अरुण दांडेकर, विनोद पाटोळे, एम.एस.रजपूत, शिवपुत्र आरबोळे, संजय यादव उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.