या कंपनीच्या शेअर्समुळे गुंतवणुकदार मालामाल; अवघ्या सात महिन्यांमध्ये पैसे दुप्पट
मुंबई: सध्या शेअर बाजारात केपीआयटी टेक्नोलॉजी लिमिटेडच्या(HGS) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात KPIT Technologies Ltd. कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 300 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. एवढेच नव्हे तर या मिडकॅप समभागाने अवघ्या सात महिन्यांत गुंतवणुकदारांना दुप्पट परतावा दिला आहे. गेल्यावर्षी याचा काळात केपीआय टेक्नोलॉजी कंपनीच्या समभागाचा भाव 78.40 रुपये इतका होता. मात्र, सध्या या समभागाची किंमत 332.70 रुपयांवर जाऊन पोहोचली आहे.
याचा अर्थ गेल्या वर्षभरात या समभागाने जवळपास 325 टक्के रिटर्न्स दिले आहेत. गेल्या तीन महिन्यांत केपीआयटी टेक्नोलॉजीच्या समभागाचा भाव 59 टक्क्यांनी वधारला आहे. तर शुक्रवारी या कंपनीच्या समभागाने 332.70 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकाला गवसणी घातली. त्यामुळे या कंपनीचे भांडवली बाजारातील एकूण मूल्य 9,061.82 कोटींवर पोहोचले आहे.
तुम्ही सात महिन्यांपूर्वी केपीआयटी टेक्नोलॉजीचे पाच लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत 10 लाख इतकी झाली आहे. एकट्या जानेवारी महिन्यात कंपनीचा समभाग 133 टक्क्यांनी वधारला होता. जून तिमाहीत कंपनीला 60.25 कोटी रुपयांचा नफा झाला होता. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीला 24 कोटी रुपयांचा नफा झाला होता. सलग दोन तिमाहींमध्ये कंपनीने नफा कमावला आहे. याशिवाय, सध्याच्या घडीला कंपनीच्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही. त्यामुळे आगामी काळातही KPIT Technologies Ltd च्या समभागाचा भाव आणखी वधारेल, असा अंदाज आहे.
महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या शेअर्सवर बंपर रिटर्न्स
सध्या शेअर बाजारात महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडच्या (MLL) समभागाची प्रचंड चर्चा आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीच्या समभागांनी गुंतवणुकदारांना 192 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. 27 जुलै 2020 रोजी महिंद्रा लॉजिस्टिक्सच्या शेअरचा भाव 276.7 रुपये इतका होता. आता याच समभागाची किंमत 807.30 इतकी झाली आहे. याचा अर्थ वर्षभरापूर्वी एखाद्या गुंतवणुकदाराने महिंद्रा लॉजिस्टिक्सचे एक लाख रुपयांचे समभाग विकत घेतले असतील तर आता त्यांची किंमत साधारण 14.58 लाखांच्या घरात गेली आहे.
गुडलक इंडियाची वेगवान घोडदौड
यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे. गुडलक इंडिया (Goodluck India) हा देखील अशाच समभागांपैकी एक आहे. या इंजीनिअरिंग कंपनीच्या शेअर्सनी गेल्या वर्षभरात गुंतवणुकदारांना 400 टक्के रिटर्न्स मिळवून दिले आहेत. या कंपनीच्या एका समभागाचा भाव 39.05 रुपयांवरून 194.90 रुपये इतका झाला आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.