Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पूरमुक्त सांगलीसाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची ऐतिहासिक पूरपरिषद - २०२१ : सांगलीच्या रक्षणासाठी पृथ्वीराजबाबा पाटील यांचा राजकीय अभिनीवेश विरहीत १००% यशस्वी रचनात्मक उपक्रम..

पूरमुक्त सांगलीसाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनची ऐतिहासिक पूरपरिषद - २०२१ : सांगलीच्या रक्षणासाठी पृथ्वीराजबाबा पाटील यांचा राजकीय अभिनीवेश विरहीत १००% यशस्वी रचनात्मक उपक्रम..


कालचा दिवस सांगलीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविण्याच्या पात्रतेचा होता. २००५, २०१९ आणि २०२१  च्या महापुरात सांगलीकर जनतेला झालेल्या त्रासानं पृथ्वीराज बाबा व्यथित झाले.. दरवर्षी  सांगली व परिसरातील जनतेची महापुरामुळे होणारी ही फरफट कायमची थांबावी या सदभावनेतून तज्ञांना निमंत्रित करुन पूरपरिषद आयोजित करायची.. महापूर का येतो.. त्याची कारणे आणि कायमची उपाययोजना कशी करता येईल यावर बोलणं.. ऐकणं आणि विचार मांडणं झालं पाहिजे ही बाबांची प्रामाणिक तळमळ सांगलीनं अनुभवली..!! स्वागत व प्रास्ताविक मा. पृथ्वीराज बाबा पाटील यांनी केले. यावेळी सांगलीला पुराचा त्रास होऊ नये म्हणून कृष्णा.. कोयना.. पंचगंगा.. वारणा व येरळा नदींच्या जलकुंभांचे  मंत्रीमहोदय व मान्यवरांच्या हस्ते पूजन करून साकडे घालण्यात आले. 

वडनेरे पूर अभ्यास समितीचे सदस्य व महाराष्ट्र शासनाच्या लाभक्षेत्र विकास विभागाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव मा. राजेंद्र पवार यांनी या परिषदेत पाऊण तास पीपीटी द्वारे सांगली व कृष्णा नदीची भौगोलिक परिस्थिती, धरणाची भूमिका, लँड ड्रेनेज, पुराची कारणे, हवामान बदल, पूर नियंत्रण, पूर नियंत्रण करणारी धरण बांधणी, अलमट्टी धरण व राजापूर बंधारा या मुद्द्यावर अत्यंत उपयुक्त माहिती दिली. जेष्ठ पत्रकार वसंत भोसले यांनी विकासाचे माॅडेल बदला.. नदीकाठी ऊस पिक कमी करुन गवताची रानं वाढवा. उंच पूल .. शहरातील नाले व ओढ्यावरील बांधकामे ही पूरसंकटाला कारणीभूत आहेत.. नद्यामधील वाळू व माती उपश्यामुळे नद्या मृत झाल्या आहेत. उंच महामार्गामुळे पाणी तटते.. पूर हे मानवनिर्मित संकट आहे.. कायमस्वरुपी उपाययोजनेसाठी सांगली - सातारा व कोल्हापूर जिल्ह्यासाठी कृष्णाखोरे पूरनियंत्रण प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना केली. यावेळी मा. वडणेरे हे आॅनलाईन मार्गदर्शन करताना म्हणाले, '' पूर परिस्थिती हाताळण्यासाठी चांगले जलशास्त्रज्ञ तयार करा.. स्थलांतर धोरण ठरवा.. सामाजिक व मानसिक परिस्थिती लक्षात घ्या... सक्षम यंत्रणा व तंत्रज्ञ तयार करा.. हवामान बदलाबरोबर बदलत रहा... पूरनियंत्रण कायदा करुन कडक अंमलबजावणी करा.. धरणे.. शासनाची कृषी व महसूल खाती व जनतेत समन्वय राखणारी यंत्रणा राबवा.. पूर आपत्ती व्यवस्थापन विभाग तयार करुन सर्वांचे समन्वय करा.. नाले.. ओढे अडवू नका.. चांगल्या अधिकाऱ्यांची मदत घ्या.. पूर नियंत्रण खाते स्थापन करुन त्याला स्वतंत्र बजेट तरतूद करा..तरच कायमस्वरूपी पूरमुक्ती मिळेल असे सांगितले.

यावेळी आ.गाडगीळ म्हणाले, ''शेती व पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून पाणी परिषदा होतात परंतु या नुकसान टाळण्यासाठी पाणी नको म्हणून पूरमुक्त सांगलीसाठी पूरपरिषद आयोजित करणाऱ्या पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा हा उपक्रम ऐतिहासिक आहे असे नमूद करून सामुदायिकपणे प्रयत्न करुन पूरमुक्त सांगली अभियान यशस्वी करु या अशी भावना व्यक्त केली. यावेळी आभाळमाया फौंडेशनचे आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांनी पीपीटी द्वारे पूरमुक्ती साठी आवश्यक उपाययोजना विशद केल्या. मयुरेश प्रभुणे यांनी पूर कारणे व उपाय पीपीटी द्वारे स्पष्ट केले. ना. डॉ. विश्वजीत कदम यांनी पूर परिस्थिती आणि जनसहभाग व शासकीय यंत्रणा सहाय्याचा आढावा घेतला. यावेळी ना. जयंत पाटील यांनी वेळोवेळी पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन स्थलांतराचे आवाहन केल्याने जीवीत हानी टळून कमी वित्तहानी झाल्याचे सांगून जनतेने कायम पूरपरिस्थितीचा अंदाज घेऊन वेळेवर स्थलांतर करावे असे आवाहन केले. कायम स्वरुपी पुनर्वसन ही प्रक्रिया थोडी जटील आहे.. जमीन संपादन अवघड होत आहे.. लोकांचा विरोध होत असतो.. लवाद निर्णयानुसार नियमांचे पालन करुन पंचगंगा व भिमा खोऱ्यातील पावसाचे पाणी बाहेर काढता येईल का याची चाचपणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पूरमुक्ती हा विषय राजकारणाच्या पलिकडचा आहे.. कोणताही राजकीय अभिनिवेश न ठेवता सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.. नद्यावरील आक्रमण कमी केले पाहिजे.. शहरात जिथून पाणी आत शिरते तेथे भिंती बांधण्याची शक्यता पडताळून पहाणे सुरू आहे. कृष्णामाई आकांडतांडव का करते याचा गांभीर्याने विचार करावा.. सामान्य माणसानेही याचा विचार करणे गरजेचे आहे.. लोकसंख्या वाढ लक्षात घेता सर्वांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे.. कायद्याचे पालन केले पाहिजे.. प्लॅस्टिक बंदीचे काटेकोर पालन करावे.. यावेळी जतचे आमदार विक्रम सावंत यांनी दुष्काळी भागातील जनतेला पुरेसे पाणी मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे.. आता ६५ गावची योजना लवकर पूर्ण करावी असे आवाहन केले.

यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी परिषदेतील ठराव मांडले. त्यामध्ये कृष्णा नदीच्या मुख्य प्रवाहातील अडथळे दूर करावेत.. बफर झोनमध्ये बांधकामे करु नयेत.. धरणातील पाणी विसर्ग नियोजन अचूक करावे.. सिंचन प्रकल्प प्रभावीपणे चालू रहावेत.. शहराभोवती बायपास फ्लायओव्हर बांधावेत.. प्लॅस्टिक बंदी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी.. स्वतंत्र पूर आपत्ती योजना सुरू करावी.. कृष्णा खोरे पूर प्राधिकरण स्थापन करावे.. नदीतील गाळ काढून नदीपात्र विस्तारीकरण करावे.. महापालिकेने पूर नियंत्रण व उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करावी.. जनजागृती करावी. हे ठराव टाळ्यांचा गजरात मंजूर करण्यात आले व ठरावाची प्रत मा. ना. जयंतराव पाटील यांना पृथ्वीराज बाबा पाटील यांनी सादर केली.

पूर या विषयातील तज्ञांना निमंत्रित करुन सांगली कायमची पूरमुक्त होण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांच्या पुढाकाराने पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचा हा सांगलीच नव्हे तर महाराष्ट्रातील ही पहिलीच पूर परिषद १००%यशस्वी झाली. या उपक्रमाला माध्यम समूहाने व सांगलीकर जनतेने भरभरुन दाद दिली. मंत्री महोदयासह सर्वांनीच या स्तुत्य उपक्रमाबद्दल पृथ्वीराज पाटील व पृथ्वीराज पाटील फौंडेशनचे अभिनंदन केले.ना.जयंत पाटील यांनी आलमट्टी धरणातून वेळीच पुरेसा विसर्ग व्हावा यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री ना. येडीयुरप्पा यांच्याशी समक्ष चर्चा करुन पूर नियंत्रणात मोलाची भूमिका बजावली व डॉ. विश्वजीत कदम यांनी पूरग्रस्तांच्या मदतीला धावून उत्तम समन्वय घडवून आणला याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचे ठराव टाळ्यांच्या गजरात पारित करण्यात आले.

राजकारणाचा उपयोग शंभर टक्के समाजकारणासाठी कसा करायचा असतो हे कोरोना व महापूर काळात कृतीतून दाखवून देणाऱ्या पृथ्वीराज पाटलांच्या या धडपडीचे मोठ्या प्रमाणात सांगलीकरांनी स्वागत केले आहे. सांगली कायमची पुराच्या समस्येतून मुक्त होण्यासाठी पृथ्वीराज बाबा पाटलांनी उचललेले हे पाऊल सांगलीकरांनी नक्कीच दिलासा देणारे आहे यात शंकाच नाही..!! कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन ही परिषद झाली. आम्ही मा. पृथ्वीराज बाबा पाटील व फौंडेशनचे हार्दिक अभिनंदन करुन तमाम सांगलीकरांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.