Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राजीव गांधी :पिढी बदलाचे अग्रदूत - पृथ्वीराजबाबा पाटील

 राजीव गांधी :पिढी बदलाचे अग्रदूत - पृथ्वीराजबाबा पाटील


सांगली दि.२० :भारताचे सर्वात तरुण वयात पंतप्रधान बनलेले स्व. राजीव गांधी हे भारताच्या पिढी बदलाचे अग्रदूत आणि सर्वाधिक जनादेश प्राप्त पंतप्रधान होते. त्यांनी आशियाई क्रीडा स्पर्धा संयोजनात भरीव कामगिरी केली आहे. रशिया.. अमेरीका व चीन देशाशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले होते. गरीबी हटाव.. दूरसंचार व आयटी क्रांती.. पंचायत राज बळकटीकरण.. अर्थव्यवस्था सुधारणा व १८ वर्षाच्या युवक व युवतींना मतदानाचा अधिकार इ. उपक्रमातून २१ व्या शतकातला भारत घडविला असे गौरवोद्गार सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील यांनी काढले. ते सांगली काँग्रेस भवन मध्ये राजीव गांधी यांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. 

बाबांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सेवादलाचे कार्याध्यक्ष अरुण पळसुले, अँड.भाऊसाहेब पवार, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष अल्ताफ पेंढारी, कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष महावीर पाटील, सांगली विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष चौधरी, मिरज शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आयुब निशाणदार, अशोक रासकर, बाबगोंडा पाटील, नितीन चव्हाण, विश्वास यादव, माणिक घोलप, सुभाष पट्टणशेट्टी, नामदेव पठाडे, शैलेंद्र पिराळे, शिवाजी सावंत, राजेंद्र कांबळे, मोहित बापू, भारती भगत, दीक्षित भगत, हे उपस्थित होते या वेळी स्व. राजीव गांधी यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.