Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगलीत पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या; अधीक्षकांचे आदेश

 सांगलीत पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या; अधीक्षकांचे आदेश

सांगली : जिल्हा पोलिस दलातील निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्यांचे आदेश आज सकाळी जारी झाले. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी अध्यक्षतेखाली अस्थापना मंडळाची बैठकीत हे आदेश देण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले.

कोरोना परिस्थितीमुळे अधिकाऱ्यांच्या जिल्हातंर्गत बदल्या थांबल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून बदल्यांचे वारे सुरू होते. आज सकाळी झालेल्या बैठकीत बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले. अकरा पोलिस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल तनपुरे यांची सुरक्षा शाखेत, तर नियंत्रण कक्षातील के. एस. पुजारी यांची विश्रामबाग प्रभारी पदी नियुक्ती देण्यात आली. इस्लामपूरचे निरीक्षक एन. एस. देशमुख यांची आर्थिक गुन्हे शाखेत, तर महात्मा गांधी पोलिस चौकीचे निरीक्षक शशिकांत चव्हाण यांची इस्लामपूरच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली. आर. एस. सावंत्रे यांची मिरज शहर पोलिस ठाण्यात नियमित नेमणुक झाली. नियंत्रण शाखेतील चंद्रकांत बेदरे यांची मिरज ग्रामीण, यु. व्ही डुबल यांची जत पोलिस ठाणे, ए. आर. मांजरे यांची आवेदन कक्ष, आर. एन. रामाघरे यांची जिल्हा विशेष शाखा, व्ही. के. पाडळे यांची गुप्त वार्ता शाखा, तर शिवाजी गायकवाड यांची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात नियुक्त करण्यात आली.

जिल्ह्यातील २५ सहायक निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक नीरज उबाळे यांची एलसीबीत बदली झाली. तर एलसीबीचे सहायक निरीक्षक रवीराज फडणीस यांना महात्मा गांधी पोलिस चौकाची प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. संजयनगर पोलिस ठाण्याचे काकासाहेब पाटील यांना विश्रामबाग, तर सायबर शाखेचे संजय क्षीरसागर यांना संजयनगर पोलिस ठाण्याची जबाबदारी देण्यात आली.

डी. जी. कोळेकर यांना वाचक शाखा, एस. डी. गोसावी यांची कडेगाव, अविनाश पाटील यांची कुपवाड औद्योगिक पोलिस ठाणे, व्ही. टी. जाधव यांची पलूस ठाणे, पी. डी. पवार यांची उमदी ठाणे, एस. एल. साळुंखे यांची चिंचणी-वांगी ठाणे, श्रीमती एम. एस. काळगावे यांची वाहतुक शाखा तासगाव, जे. एस. वाघमोडे यांची वाहतुक शाखा विटा, डी. ए. मिठारी यांची महिला कक्ष, सांगली ग्रामीणचे पी. बी. निशाणदार यांची एलसीबी, पी. डी. कांबळे यांची दहशतवाद विरोधी पथक, पी. एस. यादव यांची विश्रामबाग, एस. एस. चव्हाण यांची एएचटीयु पथक, पी. एस. शिंदे यांची सांगली ग्रामीण, ए. एन. बाबर यांची आष्टा पोलिस ठाणे, डी. बी. पाटील यांची सांगली शहर पोलिस ठाणे, व्ही. बी. झेंडे, बी. बी. झेंडे या दोघांची तासगाव पोलिस ठाणे, पी. एस. चव्हाण यांची विटा पोलिस ठाणे, टी. एन. कुंभार यांची विश्रामबाग पोलिस ठाणे, तर यु. पी. सरनोबत यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली.

तसेच जिल्ह्यातील १४ पोलिस उपनिरीक्षकांच्याही प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. त्यात एस. एस. शिंदे यांना उमदी पोलिस ठाण्यात नियमित नियुक्ती देण्यात आली. संजयनगरचे महेश डोंगरे यांची एलसीबीत, एम. व्ही जठार यांची कुपवाड, सोमनाथ कचरे यांची विश्रामबाग, एमआयडीचे राजु अन्नछत्रे यांची महात्मा गांधी चौकी, एस. एस. लवटे जत, दत्तात्रय शेंडगे यांची विटा, व्ही. व्ही. पाटील यांची कुरळप, विशाल जगताप यांची जत, पी. के. कन्हेरे यांची जत, एन. बी. दांडगे यांची एलसीबी, ए. ए. ठिकणे यांची विटा, आर. डी. पवार यांची सायबर शाखा, आर. व्ही. गोसावी यांची आटपाडी पोलिस ठाण्यात बदली झाली.



➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.