Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कृषी विभागाची रानभाज्या महोत्सव व कृषी मॉल ही संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच-पालकमंत्री जयंत पाटील

कृषी विभागाची रानभाज्या महोत्सव व कृषी मॉल ही संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच-पालकमंत्री जयंत पाटील 



सांगली, दि. 15,  :
  सेंद्रिय कृषी मालाला योग्य भाव व बाजारपेठ मिळण्यासाठी त्याबरोबर सेंद्रिय मालाचे होणारे उत्पादन तात्काळ थेट ग्रहाकांपर्यत जाण्यासाठी कृषी विभागाची रानभाज्या महोत्सव व कृषी मॉल ही संकल्पना शेतकऱ्यासाठी संजीवनीच ठरेल, असा विश्वास पालकमंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. 

नवीन जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मागील बाजूस कृषी विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात रानभाज्या महोत्सव समारोप व ॲग्री मॉलचे उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय बजाज, कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. 

यावेळी पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, विजयनगर येथे सुरु करण्यात आलेला कृषी मॉलचे भविष्यामध्ये विस्तारीकरण करण्यात यावे, जिल्ह्यातील सेंद्रीय कृषी माल उत्पादकांना हक्काची बाजारपेठ मिळावी, योग्य दर मिळावा तसेच कृषी मालाच्या उत्पादनाबाबत मार्गदर्शन लाभावे यासाठी कृषी विभागाने गतीने काम करावे. जिल्ह्यातील कृषी उत्पादक शेतकऱ्यांची गट तयार करावेत व शासनाच्या विविध योजनांमधून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. सांगली जिल्ह्यात सुमारे 1 हजार 500 शेतकरी सेंद्रीय कृषी मालाचे उत्पादन करतात या मालाला ग्राहकांपर्यंत पोचविण्यासाठी भाज्या महोत्सव हा एक चांगला पर्याय आहे. तसेच कृषी विभागाकडून ॲग्री मॉल ही संकल्पना प्रभावी व विस्तारीतपणे राबवावी असे ते म्हणाले. 

प्रारंभी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ॲग्रीमॉलचे उद्घाटन करण्यात आले. पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या प्रत्येक स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी सेंद्रीय गुळ, जॅगरी कॅडी, सेंद्रीय हळदीबरोबरच, खिल्लार गाईचे देशी तुप याचा स्वाद घेतला.  यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते ॲग्री मॉल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. ॲग्रीमॉल मध्ये सुमारे 14 शेतकऱ्यांनी व सात सेंद्रीय शेतीमाल उत्पादन कंपन्यांनी सहभाग घेतला होता. 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.