Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन राजेंद्र कांबळे साहेब यांची नूतन चेअरमन पदी निवड

सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे  चेअरमन राजेंद्र कांबळे साहेब यांची नूतन चेअरमन पदी निवड


 दी. सांगली सॅलरी अर्नर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे सन्माननीय चेअरमन माननीय राजेंद्र कांबळे साहेब यांची नूतन चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली,  जिल्हा क्षयरोग केंद्र, कुष्टरोग विभाग आणि अधिष्ठाता कार्यालय यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी नर्सेस  नर्सेस फेडरेशन, ट्रेड नर्सेस असोसिएशन चे पदाधिकारी उपस्थित होते.  यावेळी बोलताना पी एन काळे संचालक सॅलरी सोसायटी सांगली यांनी सॅलरी सोसायटीच्या कार्याचा गौरव केला. व  सोसायटी च्या  प्रगती बाबत माहिती दिली. जे.के महाडिक व डी जी मुलाणी आणि सर्व संचालक मंडळाने आरोग्य विभागाला राजेंद्र कांबळे यांच्या रूपाने न्याय दिल्याचे सांगितले.   याप्रसंगी आधिसेविका मा. सीमा चव्हाण, प्राचार्या जोश्ना बुधगावकर, आर जी शिंदे, नूरजहान पटेल ,प्रशांत कोळी, संभाजी कोळी, प्रकाश जाधव,अमोल पैलवान, गणेश धुमाळ, मास्ते सिस्टर,प्रमोद वाघमारे, अमोल पाटील, विद्यासागर चौगुले, अरविंद माने, एस के.शेवाळे, अरुण माने, अशोक संकपाल, तसेच मोठ्या संख्येने परिचारिका, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.