अल्पसंख्याक समाजाच्या विकासकामांचे प्रस्ताव तातडीने सादर करा -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
- अल्पसंख्याक समाजाच्या 11 कामांसाठी 1 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर
सांगली, दि. 10, अल्पसंख्याक समाजाची समाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती व्हावी यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. यासर्व योजनांचा लाभ संबधित घटकांना व्हावा यासाठी परिपुर्ण प्रस्ताव तातडीने सादर करा असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी लोखंडे, जिल्हा नियोजन अधिकारी सरिता यादव, जिल्हा व्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यतिन पारगावकर, जिल्हा क्रिडा अधिकारी माणिक वाघमारे, समिती सदस्य नितीन नवले, निजाम मुल्लाणी, विशाल चौगुले, सुरेंद्र वाळवेकर आदी उपस्थित होते.
अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी जिल्ह्यात राज्य शासनाकडून 11 कामे मंजूर झाली आहेत. यासाठी 1 कोटी 30 लाख इतका निधी मंजूर झाला आहे. या निधीमधून मुस्लिम दफन भूमीस संरक्षक भिंत बांधणे, जैन वसहातीमध्ये आरसीसी गटर बांधणे, मुस्लिम समाजाकरिता शारीखाना बांधकाम करणे, इदगाह मैदानांची विकास कामे करणे इत्यादी स्वरुपाची कामे केली जाणार आहेत. असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, महानगरपालिका क्षेत्रात प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत उर्दु शाळासाठी ई – लायब्ररी, सदभाव मंडप, व्यायाम शाळा, क्रिडांगण विकसन अशा प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. 11 कोटी 52 लाख 16 हजार इतका निधी आपेक्षित असून याबाबतचे प्रस्ताव तातडीने संबधित यंत्रणांनी तयार करुन जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे मंजूरीस पाठवावेत. असे आदेश त्यांनी यावेळी दिले
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.