नागपंचमीला करू नका 'या' चुका; जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि पूजा मंत्र
पुणे - सध्या पवित्र असा श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय महत्व पूर्ण आहे. हिंदू श्रद्धेनुसार या संपूर्ण महिन्यात भगवान शिवशंकर आणि पार्वतीची पूजा करणाऱ्या भक्तांना आनंदी, शांती आणि समृद्ध जीवनाचा आशीर्वाद मिळतो.
आज श्रावणातील पहिला सण म्हणजे 'नागपंचमी' आहे. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले, तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नागदेवाची पूजा केली जाते.
अशी करा नागदेवाची पूजा…
नागपंचमीची पंचमी तिथी ही दुपारी 1 वाजून 42 वाजेपर्यंत असणार आहे. या अगोदर नागदेवतेची पूजा करून घेतली पाहिजे. या दिवशी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीचे नाग आणून त्यांची पूजा करावी.
नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा. दूर्वा, दही, गंध, अक्षता, फुले अर्पण करून त्याची पूजा करावी. पूजेवेळी 'नमोsस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!' ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:! हा मंत्रोच्चार करावा.
महत्वाचे : कृषिप्रधान आपल्या देशात शेतकरी मित्र म्हणून नागांचे विशेष स्थान आहे. पिकांचे रक्षण करणार्या नागाची पूजा करून नागपंचमीला त्याचा सन्मान केला जातो. प्रत्येक जीव हा निसर्गाचा अविभाज्य भाग असून निसर्गचक्रात त्याचे महत्त्व असते हा संदेश देणार्या नागपंचमीच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.