काबुल विमानतळाचे ATC ताब्यात घेण्याची अमेरिकेची मोठी घोषणा ; नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ६,००० सैनिक केले तैनात
अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये सध्या मोठा संघर्ष सुरू आहे. आताअफगाणिस्तानच्या राजधानी काबुलवर तालिबानने ताबा मिळवला आहे. त्यामुळे आता अमेरिकेने मोठी घोषणा केली आहे. काबुल एअरपोर्टचे एअर ट्रॅफिक कंट्रोल टेक ओव्हर म्हणजेच ताब्यात घेण्याची घोषणा अमेरिकेकडून करण्यात आली आहे.
याबाबत अमेरिका म्हणाली आहे की, 'अमेरिकन नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पुढील ४८ तासांत अफगाणिस्तानमध्ये सैनिकांची संख्या वाढवून ६,००० करणार आहे. रविवारी अमेरिकेचे परराष्ट्र विभाग आणि संरक्षण मंत्रालयाने संयुक्त निवेदनात म्हटले होते की, येणाऱ्या दिवसांत अमेरिका आपल्या हजारो नागरिकांना आणि काबुलमध्ये तैनात असलेल्या युएस मिशनच्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांनी सुरक्षित बाहेर काढले.
अमेरिकेच्या एका संरक्षण अधिकाऱ्याने सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार,पेंटॅगॉनने ३,००० सैनिकांना पाठवण्यात असल्याची पहिल्यांदा घोषणा केली. परंतु अफगाणिस्तानमध्ये अचानक स्थिती बिघडल्यानंतर पेंटॅगॉनने सैनिकांची संख्या वाढवून ६,००० सैनिकांना तैनात करण्याचा निर्णय घेतला. संयुक्त निवेदनात म्हटले आहे, सध्या अमेरिका स्थलांतरित व्हिसासाठी पात्र अफगाण नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रक्रिया वेगाने करत आहे. गेल्या दोन आठवड्यांत सुमारे २,००० लोकांना अमेरिकेत पोहोचवण्यात आले. सध्याचे अफगाणिस्तानमधील परिस्थितीत पाहता, अमेरिकन दूतावासातील सर्व कर्मचाऱ्यांना कामकाज थांबवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यास सांगितले आहे..
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.