Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

तालिबानी मुलींच्या मृतदेहावरही बलात्कार करतात अफगाणी मुलीने सांगितलं प्रकार

 तालिबानी मुलींच्या मृतदेहावरही बलात्कार करतात अफगाणी मुलीने सांगितलं प्रकार


तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळविल्यानंतर तेथील जनतेमध्ये गोंधळ उडाला आहे. अफगाणिस्तान सोडण्यासाठी तेथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विमानतळावर गर्दी केली. त्यावेळी विमानतळावरुन विमान वाहतूक बंद करण्यात आली होती.

यावेळी काही महिलांनी विमानतळावर प्रवेश मिळावा यासाठी जवानांकडे मदत मागितली होती. तर आम्हाला वाचवा, तालिबानी आमच्यासाठी येत आहेत अशी विनंती महिलांनी अमेरिकन सैन्याकडे केल्याचे व्हिडियो सध्या चांगलेच व्हायरल होत आहे.

यातच ताबा मिळवल्यानंतर तालिबान्यांनी आपली सर्व क्षेत्राविषयी भूमिका स्पष्ट केली आहे. त्यात महत्वपूर्ण भूमिका महिलांच्या बाबतीत असल्याचे म्हटले जात आहे. असं असले तरी अफगाणिस्थानच्या महिलांना तालिबान्यांच्या भूमिकांवर विश्वास नाही. आता पर्यंत अफगाणिस्थानातून बाहेर निघालेल्या नागरिकांनी तेथील परिस्थतीबाबत माध्यमांना सांगितलं आहे.

यातच अफगाणिस्तानमधून भारतात पोहचलेल्या महिला मुस्कान यांनी तालिबानी दहशतवाद्यांची क्रुरता सांगितली. त्यांनी म्हटले की तालिबानी दहशतवादी मुलींच्या मृतदेहावरही बलात्कार करतात. त्यांच्याकडून माणूसकीची आशा करता येणार नाही. तिने हिंदी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तालिबानीना मुलगी जिवंत आहे की मेलेली ते तिच्यावर बलात्कार करतातच. ती पुढे म्हणाली, ते मुलींचे अपहरण करून गोळी घालतात ते फार क्रूर कृत करतात.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.