Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ED च्या अधिकारी आता कमळ हातात घेण्याच्या तयारीत ?

 ED च्या अधिकारी आता कमळ हातात घेण्याच्या तयारीत ?


नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह लवकरच भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आयपीएस अधिकारी राजेश्वर सिंह हे भाजपच्या प्रमुख नेत्यांशी सातत्याने चर्चा करत आहेत. आभा सिंह यांनी ट्विट करून लिहिले आहे की, देशसेवा करण्यासाठी अकाली निवृत्ती घेतल्याबद्दल ईडीमधील माझे भाऊ राजेश्वर यांचे खूप खूप अभिनंदन. देशाला तुमची गरज आहे.

राजेश्वर सिंह नेमके कोण ?

राजेश्वर सिंह त्यांच्या कार्यकाळात एअरसेल-मॅक्सिस, 2 जी स्पेक्ट्रम, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ गेम्स घोटाळा आणि अगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यासारख्या अनेक हायप्रोफाईल प्रकरणांचा तपास झाला.राजेश्वर सिंह सध्या लखनौमध्ये सहसंचालक म्हणून कार्यरत आहेत. 2009 मध्ये ते उत्तर प्रदेशातून प्रतिनियुक्तीवर ईडीमध्ये सामील झाले. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

राजेश्वर यांनी भ्रष्टाचार प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कीर्ती चिदंबरम यांच्याविरोधात तपास आणि कारवाईमध्ये महत्वाची भूमिका बजावली. उत्तर प्रदेश राज्यातील सुल्तानपूर येथील रहिवासी असलेल्या राजेश्वर सिंह यांच्याकडे कायद्याची आणि मानवाधिकारांची पदवी आहे. परंतु, आजपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याला त्यांच्याविरूद्ध चुकीचे काम केल्याचे पुरावे सापडले नाहीत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.