Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आतापर्यंत 30 लाख खासगी नोकरदारांकडून 'या' सरकारी पेन्शन योजनेचा लाभ, 500 रुपयांपासून करा सुरुवात

आतापर्यंत 30 लाख खासगी नोकरदारांकडून 'या' सरकारी पेन्शन योजनेचा लाभ, 500 रुपयांपासून करा सुरुवात

नवी दिल्लीः नॅशनल पेन्शन सिस्टीम अंतर्गत कॉर्पोरेट आणि रिटेल सेक्टरच्या ग्राहकांची संख्या आतापर्यंत 30 लाखांच्या पुढे गेलीय. या भागधारकांचा निधी ऐतिहासिक 1 लाख कोटी रुपयांच्या जवळ पोहोचलाय. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी चे अध्यक्ष सुप्रतिम बंडोपाध्याय यांनी ही माहिती दिली. एनपीएस ग्राहकांच्या डेटामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, कॉर्पोरेट, ऑल सिटिझन मॉडेल आणि एनपीएस लाईट या पाच श्रेणींचा समावेश आहे.

NPS मध्ये सामील होणाऱ्यांची संख्या सतत वाढतीच

पीएफआरडीएचे अध्यक्ष म्हणाले की, सरकारी नोकर एनपीएसमध्ये सामील होत आहेत. कारण त्यांच्यासाठी हे करणे आवश्यक आहे. पण किरकोळ क्षेत्रातील लोक त्यांच्या इच्छेनुसार त्यात सामील होत आहेत. या विभागात NPS मध्ये सामील होणाऱ्यांची संख्या सतत वाढत आहे.

एकूण भागधारकांची संख्या 30 लाख ओलांडली

ते म्हणाले, बिगर सरकारी क्षेत्रात (कॉर्पोरेट आणि सर्व नागरिक मॉडेल) 14 ऑगस्टपर्यंत आम्ही पाहिले की, एकूण भागधारकांची संख्या 30 लाख ओलांडली. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदार ही आमच्यासाठी मोठी उपलब्धी आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारांशी बोलताना बंद्योपाध्याय म्हणाले की, तीन वर्षांपूर्वी किरकोळ आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आमच्या भागधारकांची संख्या 13 ते 13.5 लाख होती. ते म्हणाले की, अशा परिस्थितीत या दोन श्रेणींमध्ये भागधारकांची संख्या तीन वर्षांत प्रत्यक्षात दुप्पट झालीय.

तुम्ही महिन्याला 500 रुपयांपासून सुरुवात करू शकता

एनपीएस योजनेद्वारे तुम्ही एका आर्थिक वर्षात सुमारे 6,000 रुपयांचे किमान योगदान 500 रुपयांच्या मासिक हप्त्यांच्या स्वरूपात करू शकता. 18 ते 70 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत नोंदणी करू शकतो. राष्ट्रीय पेन्शन योजनेंतर्गत खाते उघडणे सोपे आहे आणि त्याचे खाते घरी बसून उघडता येते आणि दरमहा निश्चित रकमेची गुंतवणूक केली जाऊ शकते.

एनपीएसमध्ये ग्राहकांना करमाफीची सुविधाही

एनपीएसमध्ये ग्राहकांना करमाफीची सुविधाही मिळते. आयकर कायद्याच्या कलम 80CCD (1), 80CCD (1b) आणि 80CCD (2) अंतर्गत कर सूट उपलब्ध आहे. कलम 80 सी अंतर्गत 1.50 लाख रुपयांव्यतिरिक्त तुम्ही NPS वर 50,000 रुपयांची अतिरिक्त कपात करू शकता. NPS मध्ये गुंतवणूक करून तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत आयकर सूट मिळवू शकता. नॅशनल पेन्शन सिस्टीम अंतर्गत तुम्ही 60 वर्षांच्या वयानंतर 60 टक्के पैसे काढू शकता. म्हणजेच 60 वर्षांनंतर, तुम्ही तुमच्या परिपक्वता रकमेच्या 60 टक्के रक्कम कोणत्याही टॅक्सशिवाय काढू शकता.

गुंतवणूक 97,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली

ते म्हणाले, किरकोळ ग्राहक हे गंभीर गुंतवणूकदार आहेत. कॉर्पोरेट आणि रिटेल विभागात एकूण गुंतवणूक 97,000 कोटी रुपयांवर पोहोचली. अशा स्थितीत तो लवकरच एक लाख कोटी रुपयांचा ऐतिहासिक आकडा गाठणार आहे. ते म्हणाले की, बिगरसरकारी क्षेत्रातील 30 लाख भागधारक हे एक महत्त्वाचे यश आहे. सरकारी क्षेत्राच्या तुलनेत या क्षेत्रात नावनोंदणी ऐच्छिक आहे. एनपीएस अंतर्गत, 12 वर्षांमध्ये 30 लाख स्वयंसेवी ग्राहकांचा आकडा गाठला गेलाय.

एका वर्षात भागधारकांची संख्या 35 टक्क्यांनी वाढली

14 ऑगस्ट 2021 रोजी कॉर्पोरेट भागधारकांची संख्या 11.97 लाख होती. मार्च 2018 पर्यंत ते 6.96 लाख होते. सर्वजण मॉडेल अंतर्गत या कालावधीत ग्राहकांची संख्या 6.92 लाखांवरून 18.06 लाख झाली. वर्षानुवर्ष आधारावर किरकोळ मॉडेल अंतर्गत ग्राहकांची संख्या 15 ऑगस्ट 2020 रोजी 13.39 लाखांपेक्षा 35 टक्क्यांनी वाढली. किरकोळ विभागातील मालमत्ता अंडर मॅनेजमेंट (AUM) 61 टक्क्यांनी वाढून 25,639.16 कोटी रुपये झाली, जे एक वर्षापूर्वी 15,928.71 कोटी रुपये होती. कॉर्पोरेट क्षेत्राची AUM एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 44 टक्क्यांनी वाढून 71,674.59 कोटी रुपये झाली.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.