Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे - नाना पाटेकर

 मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे - नाना पाटेकर


पुणे : मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे. मुसलमानांना देखील इथलं सगळं आपलं वाटायला पाहिजे, ते पण इथलेच आहेत की. त्यांच्यासाठी काम करणं गरजेचं आहे, असं मत सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर  यांनी व्यक्त केलंय.

आगीत घरं भस्मसात झालेल्या कुटुंबीयांना नाम फाउंडेशनतर्फे नवी घरं सुपूर्द

नाम फाउंडेशनच्या वतीने आज खडकवासल्या जवळच्या बहुली येथे आगीत जळालेली 16 घरे बांधून देण्यात आलीत. ही घरे नाना पाटेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यात आलीय. त्यावेळी नाना बोलत होते.

मुस्लिम मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणलं पाहिजे

“सगळ्या गोष्टी सरकारच्या भरोश्यावर शक्य नाही जे जमेल ते प्रत्येकाने करावं, असं सांगत काश्मीरमध्ये वॉटर बँक देऊन मुस्लिम मुलांना मुख्य प्रवाहात आणायचे प्रयत्न सुरु आहेत.. त्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे.. ते ही आपलेच असून दोन तीन पिढ्या पूर्वी कन्व्हर्ट झालेत… सगळ्यांमधला माणूस शोधायला हवा, येणारा प्रत्येक जण हा जाणार आहे याच्यावर विश्वास ठेऊन चांगलं काम करायला हवं”, असं नाना पाटेकर म्हणाले.

अभिमानाने सांगतो, माझ्या सातबाऱ्यावर खूप माणसं आहेत!

“संपत्तीचा किती संचय करणार आहोत आपण… एक दिवस जाणार आहोत यावर आपण कधी विश्वास ठेवणार आहोत… माझ्या सातबाऱ्यावर इतकं आहेत, तितकं आहे… असं लोक सांगतात पण माझ्या सातबाऱ्यावर खूप लोकं आहेत, असं मी अभिमानाने सांगतो”, असंही नाना म्हणाले.

नाम फाऊंडेशनला खूप लोकांनी पैसे दिले, गैरव्यवहार होणार नाही याची लोकांना शाश्वती

“नामला आतापर्यंत खूप लोकांनी पैसे दिलेत.. लोकांना विश्वास आहे की नामला दिलेल्या पैशांचा गैरव्यवहार होणार नाही. याची मला ग्वाही देण्याची गरज नाही किंबहुना पडणारही नाही, त्यांचे पैसे योग्य कामाला लागतात, हा लोकांना विश्वास वाटतो”, असं नाना म्हणाले.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.