Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

फ्रेंडशिप डे'च्या दिवशीच वाद, सहा मित्रांकडून तरुणाची हत्या

 फ्रेंडशिप डे'च्या दिवशीच वाद, सहा मित्रांकडून तरुणाची हत्या



नागपूर : शहरात हत्येचं सत्र थांबण्याचं नावच घेत नाहीय. फ्रेंडशिप डेच्या दिवशी झालेल्या वादातून नागपुरात 21 वर्षीय अनिकेत भोतमांगे या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. फ्रेंडशिप डेच्या दिवशी झालेल्या भांडणानंतर काल रात्री नंदनवन ठाण्यातील हिवरी नगर भागात त्याच्याच मित्रांनी अनिकेतची हत्या केली. मृतक अनिकेत हा विंडो फ्रेमिंगचे काम करायचा. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच मित्रच आपल्या मित्राची हत्या कशी करु शकतो? असा प्रश्न काही जणांकडून उपस्थित केला जातोय.

मृतकाचे वडील रुग्णालयात गेल्यावर त्यांना खरं समजलं

मृतक अनिकेतच्या वडिलांना त्याच्या मित्रांनी काल रात्री (3 ऑगस्ट) फोन करुन याबाबत माहिती दिली. अनिकेतला दुखापत झाली असल्यामुळे त्याला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती त्याच्या मित्रांनी वडिलांना दिली. त्यानंतर अनिकेतचे वडील मेयो रुग्णालयात गेले असता त्यांना अनिकेतची हत्या झाल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे अनेकेतच्या वडिलांवर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांनी रुग्णालयातच टाहो फोडला. या घटनेमुळे अनिकेतच्या संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला.

पाच जणांना बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सहा जण दोषी आहेत. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. डीसीपी अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनात नंदनवन पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

भंडाऱ्यातही मित्रांकडून मित्राची हत्या

विशेष म्हणजे अगदी अशीच घटना भंडाऱ्यातूनही समोर आली आहे. पार्टीत मद्यपान केल्यानंतर झालेल्या वादानंतर 22 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली. लोखंडी रॉडने वार केल्यानंतर चाकूने भोसकून तरुणाचा खून करण्यात आला. त्यानंतर त्याला जाळून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. भंडारा जिल्ह्यात घडलेल्या हत्येप्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अभिमन्यू अरविंद माने असे 22 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील बघेडा येथे ही घटना उघडकीस आली.

अभिमन्यू माने बघेडा येथे मित्राकडे पार्टीसाठी गेला होता. तिथे मद्यप्रशन केल्यानंतर तरुणांमध्ये वाद झाला. वादात लोखंडी रॉडने वार करुन आरोपीने अभिमन्यूची चाकूने भोसकून हत्या केली. त्यानंतर त्याचा मृतदेह गावाजवळील नाल्यात फेकला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. गोबरवाही पोलिसानी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.