'मन की बात'मधील महत्त्वाचे 'पाच' मुद्दे..
नवी दिल्ली : 'मन की बात' या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांशी संवाद साधत असतात. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम घेतला जातो. या कार्यक्रमातून देशभरातून नागरिक सहभाग नोंदवित असतात. आज पंतप्रधानांची 80 वी 'मन की बात' होती. यामध्ये त्यांनी अनेक महत्वांच्या मुद्यावर चर्चा केली आहे.
'मन की बात'मधील महत्त्वाचे पाच मुद्दे
१. देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. आपल्याला हे लक्षात ठेवावे लागले की स्वच्छ भारत अभियानाला आपण कधीही मंद पडू देणार नाही. आपल्या देशात जितके शहर 'वॉटर प्लस सिटी' होतील तितकी स्वच्छता वाढेल. आपल्या नद्या साफ होतील आणि पाणी वाचवण्याच्या जबाबदारीचेही शिक्षण मिळेल. करोना काळात स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे
२. येत्या काही दिवसांत विश्वकर्मा जयंती येणार आहे. भगवान विश्वकर्माला आपल्याकडे विश्वाच्या उत्पत्तीचे प्रतिक मानले जाते, जो आपल्या शक्तीने वस्तूंची निर्मिती करतो. यात छोट्या-मोठ्या वस्तू, सॉफ्टवेअर, सॅटेलाईट या वस्तूही येतात. ही सर्व विश्वकर्माची उत्पत्ती आहे. आपल्याला कौशल्य असणाऱ्या लोकांचा सन्माना करायला हवा. कौशल्य मिळवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.
३. गेल्या काही वर्षांत झालेल्या प्रयत्नामुळे संस्कृतबाबत जागरुकता वाढली आहे. आता आपल्याला या दिशेने अधिक प्रयत्न करावे लागतील. आपला जुना वारसा सांभाळणे आणि तो पुढच्या पीढीपर्यंत देणे हे आपले कर्तव्य आहे. यासाठी सर्वांचे प्रयत्न व्हायला हवेत.
४. आज जगभरातील लोक अध्यात्म आणि दर्शन याबाबत चर्चा करत आहेत. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की या महान परंपरेला आपण पुढे घेऊन जावं, जे कालबाह्य आहे त्याला सोडून द्यायला हवं, पण जे कालातीत आहे त्याला पुढे घेऊन जायला हवं.
५. तरुणांनी वेगवेगळ्या खेळ प्रकारात कौशल्य मिळवायला हवं. गावागावात खेळांच्या स्पर्धा सुरु राहायला हव्यात. मेजर ध्यानचंद यांनी जो मार्ग तयार केला आहे, त्या मार्गावर आपल्याला पुढे जावं लागले. कित्येक वर्षानंतर खेळांबाबत कुटुंब, समाज, राज्य आणि राष्ट्र एकमताने सोबत आल्याचे पाहायला मिळत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.