Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

916 रुपयांच्या बचतीवर मिळेल 4 लाखांचा रिटर्न; LIC ची खास पॉलिसी

 916 रुपयांच्या बचतीवर मिळेल 4 लाखांचा रिटर्न; LIC ची खास पॉलिसी


नवी दिल्ली, 23  : सध्याच्या काळात लाईफ इन्शुरन्स, म्हणजेच जीवन विमा हा अत्यंत आवश्यक ठरतो आहे. पण, विम्यासाठी दरमहा, किंवा ठराविक कालावधीनंतर मोठी रक्कम जमा करणं सगळ्यांनाच शक्य नसतं. कमाईच कमी असेल तर, विम्यासाठी खास अशी रक्कम बाजूला काढता येत नाही. पण एका विमा योजनेत तुम्ही महिन्याला केवळ 916 रुपये बाजूला काढून, चार लाखांपर्यंतचा फायदा मिळवू शकता. एलआयसीची ही एक खास पॉलिसी आहे, जिचा टेबल नंबर 943 आहे. आधार स्तंभ असं या पॉलिसीचं नाव आहे. ही पॉलिसी शेअर बाजाराशी जोडलेली नाही. तसंच, ही केवळ पुरुषांसाठी असलेली विमा योजना आहे, ज्यामध्ये रेग्युलर प्रिमियम  भरणं गरजेचं असते. यामध्ये सर्व्हायवल बेनिफिट आणि डेथ बेनिफिट हे दोन्हीही मिळू शकतात. पॉलिसी होल्डर  जर टर्म पूर्ण होईपर्यंत जिवंत असेल, तर त्यांना सम अशुअर्ड, म्हणजेच मॅच्युरिटीची रक्कम आणि लॉयल्टी ॲडिशन मिळेल. जर, पॉलिसी घेतल्यानंतर पाच वर्षांमध्ये पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाला, तर त्याच्या नॉमिनीला सम अशुअर्ड  आणि लॉयल्टी ॲडिशन दिली जाते. तसंच, पॉलिसी घेतल्याच्या पाच वर्षांनंतर होल्डरचा मृत्यू झाल्यास, नॉमिनीला सम अशुअर्डच्या 105 टक्के रक्कम, आणि लॉयल्टी ॲडिशनची रक्कम दिली जाते.

8 ते 55 या वयोगटातील व्यक्ती ही पॉलिसी घेऊ शकते. यात कमीत कमी 10 वर्षे, तर जास्तीत जास्त 20 वर्षांपर्यंचा टर्म पीरिएड निवडता येतो. तसंच, कमीत कमी 75 हजार, ते जास्तीत जास्त तीन लाख रुपयांपर्यंतचा विमा आपण घेऊ शकतो. यात प्रिमियम भरण्यासाठी मासिक, तिमाही किंवा सहामाही असे पर्याय उपलब्ध आहेत.समजा, एखाद्या व्यक्तीने 3 लाख रुपयांचा विमा घेतला, आणि पॉलिसी पिरियड 20 वर्षे निवडला आहे. तर त्या व्यक्तीला 20 वर्षांपर्यंत दरमहा 916 रुपये जमा करावे लागतील. 20 वर्षांनंतर ही व्यक्ती जिवंत असेल, तर त्याची पॉलिसी मॅच्युअर होईल आणि तिला सम अशुअर्ड म्हणजे तीन लाख रुपये मिळतील. यासोबतच त्या व्यक्तीला लॉयल्टी ॲडिशन म्हणून 97,500 रुपयेही मिळतील. म्हणजेच, या व्यक्तीला एकूण 3,97,500 रुपये मिळतील. दुर्देवाने जर 20 वर्षांच्या दरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्या व्यक्तीच्या नॉमिनीला सम अशुअर्डचे तीन लाख आणि लॉयल्टी ॲडिशनही मिळेल. या व्यक्तीने किती वर्षे प्रिमियम भरला आहे, त्यानुसार लॉयल्टीची रक्कम ठरेल. अशा प्रकारे महिन्याला सुमारे हजार रुपयांची बचत करुन, तुम्ही चार लाखांपर्यंतचा फायदा मिळवू शकता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.