2 दिवसात 1700 रुपयांनी स्वस्त झालं सोनं
नवी दिल्ली, 10 ऑगस्ट: सोन्याच्या किंमतीमध्ये आज तेजी पाहायला मिळाली आहे. मंगळवारी मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे दर वधारले आहेत. एमसीएक्सवर ऑक्टोबरच्या सोन्याची वायदे किंमत 0.37 टक्क्यांनी वाढली आहे. तर आज चांदीच्या किंमतीत 0.84 टक्क्यांची उसळी पाहायला मिळाली. शुक्रवारी सोन्याच्या दरात 1000 रुपयांची घसरण पाहायला मिळाली होती. सोमवारी सोन्याचे दर 700 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे शुक्रवारी आणि सोमवारी या दोन दिवसात सोन्याचे दर 1700 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. एमसीएक्सवर ऑक्टोबरच्या सोन्याची वायदे किंमत 170 रुपयांनी वाढून 46,056 रुपये प्रति तोळा झाली आहे. तर सप्टेंबरच्या चांदीची वायदे किंमत 525 रुपयांच्या वाढीनंतर 63,162 रुपये प्रति किलो झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर ग्लोबल मार्केटबाबत बोलायचे झाले तर सोन्याची किंमत गेल्या काही महिन्यांच्या निचांकी पातळीवर पोहोचली आहे. स्पॉट गोल्डची किंमत 1,730.47 डॉलर प्रति औंस झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे दर 23.43 डॉलर प्रति औंस आहेत. आधीच्या सत्रात चांदीचे दर गेल्या 8 महिन्यातील निचांकी पातळीवर पोहोचले होते.
PF वरील व्याजाच्या पैशासंदर्भात मोठी अपडेट! कधी मिळणार EPFO सदस्यांना पैसे? स्वस्तात करा सोन्याची खरेदी 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत सरकारकडून स्वस्तात सोनेखरेदीची संधी आहे. सरकारकडून सॉव्हरेन गोल्ड बाँड इशू करण्यात आले असून, यावेळी किंमत 4,790 रुपये प्रति ग्रॅम आहेत. ही सॉव्हरेन गोल्ड बाँडची पाचवी सीरिज
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.