Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

गेल ऑम्वेट यांचं निधन

 गेल ऑम्वेट यांचं निधन


ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ, लेखिका, स्त्री आणि श्रमिकांच्या हक्कांच्या चळवळीतल्या कार्यकर्त्या डॉ. गेल ऑम्वेट यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 81 वर्षांच्या होत्या. सांगली जिल्ह्यातल्या कासेगावात त्या व त्यांचे पती डॉ. भारत पाटणकर राहात होत्या. तिथंच उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. गेल ऑम्वेट यांचं नाव जागतिक पातळीवर भारतीय समाजशास्त्रवरील अधिकार असणाऱ्या अभ्यासक म्हणून घेतलं जातं.

विशेषत: भारतीय जातसंस्था, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरप्रणित चळवळी, स्त्रियांचे आणि श्रमिकांचे प्रश्न आणि लढे हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते.

त्यासंदर्भात त्यांनी विपुल लिखाण केलं. त्यांची पंचवीसहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह भारत आणि परदेशातील अनेक विद्यापीठांत त्यांनी शिकवलंही.

गेल ऑम्वेट या मूळच्या अमेरिकेच्या, पण भारतीय चळवळींच्या अभ्यासासाठी त्या इथे आल्या आणि भारताच्याच बनून गेल्या. महात्मा फुले यांच्या कार्याचा आणि चळवळीचा संदर्भ घेत वसाहतवादी भारतातील सामाजिक-सांस्कृतिक बंडाचा अभ्यास त्यांनी केल्या. तोच त्यांचा डॉक्टरेटचा प्रबंधही होता.

गेल ऑम्वेट यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचाही सखोल अभ्यास केला आणि त्यावर लिखाणही केलं.

या निमित्तानं भारतीय जातिसंस्थेचा त्यांचा अभ्यास, महाराष्ट्रातल्या संतपरंपरेचा अभ्यास यावरही त्या लिहित-बोलत राहिल्या. मराठीवर त्यांचं प्रभुत्व होतं.

गेल ऑम्वेट यांच्या अभ्यासामुळे आणि संशोधनामुळे कायमच्या महाराष्ट्राच्याच झाल्या. त्यांनी भारतीय नागरिकत्वही घेतलं आणि डॉ. भारत पाटणकरांशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर सांगली जिल्ह्यातलं कासेगांव हे त्यांचं घर झालं.

श्रमिक मुक्ती दला'च्या विविध आंदोलनांमध्येही त्यांनी भाग घेतला. परित्यक्तांच्या प्रश्नांशीही त्या कायम जोडलेल्या राहिल्या.

अभ्यास, प्रवास, लेखन आणि चळवळ यांत केलेल्या कामानं गेल ऑम्वेट या भारतात आणि भारताबाहेरही विदुषी म्हणून गणल्या गेल्या. त्यांना विविध पुरस्कारांनीही गौरवलं गेलं.


 

सत्यशोधक ब्राम्हणेतर चळवळीला जागतिक संदर्भ दिला- सदानंद मोरे

"गेल यांनी महाराष्ट्रतल्या सत्यशोधक ब्राम्हणेतर चळवळीचा अभ्यास केला आणि त्याचं पुनरुज्जीवन करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. मुख्य म्हणजे त्या चळवळीला त्यांनी जागतिक संदर्भ देत त्या पातळीवर त्यांनी नेलं. त्या महाराष्ट्रात आल्या आणि लाल निशाण पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अगोदर अभ्यास सुरू केला. त्यांचा दृष्टिकोन मार्क्सवादी होता. पण शेवटच्या टप्प्यावर अपरिहार्यपणे तुकोबांपाशी आल्या.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.