3 वर्षांच्या फिक्स्ड डिपॉझिट वर मिळेल 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज
नवी दिल्ली, 15 ऑगस्ट: जर तुमचा देखील फिक्स्ड डिपॉझिट मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. एफडीमध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित आणि कमी जोखीम असणारी आहे. बँकांकडून 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडीची सुविधा दिली जाते. अशावेळी तुम्ही कोणत्या बँकेत एफडी काढायची असा विचार करत असाल तर डीसीबी बँक हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. बँक 3 वर्षांसाठीच्या एफडीवर 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज दर देत आहे. तुम्ही देखील या एफडी स्कीमचा फायदा घेऊ शकता. तुम्ही एफडीवरील जास्त व्याजदराचा फायदा 16 ऑगस्टपर्यंत मिळवू शकता. यानंतर फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुम्हाला सामान्य दराने व्याज मिळेल. जाणून घ्या काय आहे गुंतवणुकीची प्रक्रिया किती मिळेल व्याज? या कालावधीसाठी देशातील विविध बँका 6.25 टक्क्यांपर्यंत व्याज देतात. अशावेळी डीसीबी बँकेची ऑफर फायद्याची ठरेल. कारण डीसीबी बँकेत तुम्हाला 3 वर्षांच्या एफडीवर 7.11 टक्के दराने व्याज मिळेल.
ऑनलाइन काढता येईल FD तुम्ही ऑनलाइन देखील ही एफडी काढू शकता. याकरता तुम्हाला बँकेच्या चकरा मारण्याची आवश्यकता नाही. शिवाय तुमचे बँकेत बचत खाते नसेल तरी देखील तुम्ही या एफडी योजनेचा फायदा घेऊ शकता.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.