धनगर समाजाच्या नेत्यांची अवस्था धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा अशी; धनगर समाजाला सर्वक्षेत्रांबरोबरच ३० टक्के राजकीय आरक्षण द्या : माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची मागणी
धनगर समाजाच्या नेत्यांची अवस्था धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा अशी झाली असून तंत्रज्ञानाच्या युगातही समाज मागास अवस्थेत आहे. स्वराज्यात समाज हमाल बनला असून सरकार याकडे दुर्लक्ष आहे. जातवार जनगणना करून धनगर समाजाला सर्वक्षेत्रांबरोबरच राजकारणातही ३० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी धनगर समाजाचे माजी ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत केली.
अण्णासाहेब डांगे यांनी पत्रकार परिषदेत धनगर समाजाची सध्याची अवस्था आणि सरकारकडून होणारे दुर्लक्ष यावर लक्ष वेधले. ते म्हणाले. केंद्र सरकारने पूर्वी इतर मागास समाजाला २७ टक्के आरक्षण दिले होते. राज्यशासनाने ते ३० टक्के केले होते. परंतु त्यामध्ये अन्य घटकांचा समावेश केल्यामुळे ते २७ टक्के इतकेच राहिले आहे. राजकीय आरक्षण रद्द केल्यामुळे समाजाला त्याचा अणखी फटका बसला आहे. शैक्षणिक आरक्षणाचा लाभ देत असताना गुणवत्ता यादीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश सर्वधारण गटामध्ये केला पाहिजे तर कमकुवत असणाऱ्यांसाठी आरक्षणाचा लाभ दिला पाहिजे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शासनाने इतर मागास वर्गीय मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहे सुरू करावीत. धनगर समाज आपल्या पारंपारीक मेंढी पालनाच्या व्यवसायापासून दूर गेला आहे. त्याला कारण पूर्वी या व्यवसायाला राजाश्रय होता. शेतकऱ्यांचा आधार होता. परंतु रासायनिक खते आल्यापासून मेंढ्यांना शेतकरी बांधावरही येऊ देत नाहीत. पूर्वी ९० टक्के धनगर समाजा हा व्यवसाय करत होता. परंतु त्यातील ८० समाज या व्यवसायातून बाहेर पडाला आहे. त्यातील बहुतांश समाज हा मुंबईमध्ये हमाली करत आहेत. धनाचा आगर असणारा हा समाज स्वराज्यात हमला बनला आहे. ७० टक्के समाज मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतो आहे. याचा सरकारने काहीच विचार केलेला नाही. शेळ्यामेंढ्या पालनाच्या फायद्याच्या धंद्यातून समाज बाहेर पडला याचा गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे. हा व्यवसाय करणाऱ्या सर्व जातीच्या लोकांना कर्ज दिले पाहिजे. त्यामध्ये जात बघण्याची आवश्यकता नाही. शेळ्या मंढ्या पालन व्यवसायाचे पुनर्जीवन करण्यासाठी सरकारने शेळी महामंडळाला दरवर्षी एक हजार कोटी द्यावेत. या महामंडळाकडे निधी नसल्यामुळे महामंडळ असून नसल्यासारखे आहे. मेंढ्याच्या खरेदीबरोबरच मेंढवाडे बांधण्यासाठीही कर्ज द्यावे. तंत्रज्ञानाच्या जमान्यात आजही अनेक धनगर आपला सगळा संसाराचा लवाजमा सोबत घेऊन भटकंती करत फिरत असतो. रस्त्याने मेंढ्यांच्या कळपाबरोबर चालताना गाढवाच्या पाठीवर कुत्र्याच्या पिल्ल्याबरोबर स्वत:चे मुलही बांधलेले आपल्याला दिसते. ही धनगर समाजाची खरी अवस्था आहे. बऱ्याचदा मेंढ्या जबरदस्तीने चोरून नेल्या जातात. मुक्काच्या ठिकाणी अनेक मुलींवर जबरदस्ती करण्याचे प्रकार घडतात. परंतु ते उघड होत नाहीत. पोलीसच चोरांना सामिल आहेत. असा अरोपही डांगे यांनी केला. चोर करणारे आणि महिलांना त्रास देणाऱ्यांवर ऍट्रॉसिटी प्रमाणे गुन्हे दाखल होऊन शिक्षा झाली पाहिजे. अशी मागणी करत हा समाज उभा राहण्यासाठी सरकारने जबाबदारी घ्यावी. अशी मागणी केली. अण्णासाहेब डांगे म्हणाले, धनगर समाजाच्या ३२ पोट शाखा आहेत. यातील खाटीक, डंगे, वैद्यु या तिन शाखांचा समावेश पद्मभूषण वसंतरावदादा पाटील मुख्यमंत्री असताना मागासवर्गीय प्रवर्गात केला होता. आता होणाऱ्या जनगणणेत खाटीक, डंगे, वैद्यु या पोट शाखा सोडून सर्व समाजाने आपला उल्लेख फक्त धनगर असाच करावा. जात निहाय जनगणना झाली तरच प्रत्येक जातीची नेमकी संख्या समोर येईल. राज्यात १ कोटी १० लाख धनगर समाज आहे. परंतु जनगणनेत जातीचा उल्लेख नसल्यामुळे ८० लाखापर्यंत समाज असल्याचे दिसते. त्यामुळे यावेळच्या जनगणनेत धनगर जातीचा उल्लेख सर्वांनी करावा. पोट शाखेचा आग्रह धरण्याची आवश्यकता नाही.
अण्णासाहेब डांगे यांनी राज्यांना आरक्षणाचा अधिकार देणे चुकीचे असल्याचे म्हटले. ते म्हणाले, राज्यांना आरक्षणाचे अधिकार देणे म्हणजे देशाच्या फुटीला निमंत्र दिल्यासारखे आहे. आरक्षणाचा अधिकार हा केंद्र सरकारला आहे. तो केंद्रालाच असला पाहिजे. सर्व समाजाची विशिष्ट पातळीवर प्रगती होत नाही तोपर्यंत आरक्षण हे दिलेच पाहिजे. केंद्राकडे हा अधिकार असला तरी काही नेते जाणिवपूर्वक राज्याकडे अधिकार असल्याचा गैरसमज पसरवत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.