Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अण्णा हजारेंचा सरकारला इशारा; "मंदिरं सुरु करा, अन्यथा आंदोलन करू!"

 अण्णा हजारेंचा सरकारला इशारा; "मंदिरं सुरु करा, अन्यथा आंदोलन करू!"


मुंबई: राज्यात अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही आणि म्हणूनच धार्मिक स्थळे अजूनही बंद आहेत. या गोष्टीवरून राज्यसरकारला विरोधकांच्या टीकांना सामोरं जावं लागतंय. समाजसेवक अण्णा हजारेंनीही आता त्यांचं मत दिलं आहे. अण्णा हजारे यांनी विडिओ द्वारे त्यांचं मत व्यक्त केलं आहे. अण्णा हजारे यांनी सरकारला आवाहन दिलं आहे. धार्मिक स्थळे सुरु करा नाहीतर आंदोलन करू असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.

मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे

समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील मंदिरे मागणी होऊनही उघडली जात नसल्याबद्दल राज्यसरकरला धारेवर धरत आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंदिर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी अण्णांची भेट घेऊन मंदिरे उघडण्यासाठी समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याबाबत माहिती दिली. यावेळी समिती सदस्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अण्णांनी आपण समितीने केलेल्या आंदोलनात सहभागी होऊ असे आश्वासन दिले.

राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचणआहे, दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तेथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाहीये का असा सवाल उपस्थित करत अण्णांनी ज्या मंदिरातील दर्शनाने सात्विक विचारातून माणसे घडत आहेत अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवले ? असा सवाल करताना जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे संतापले. मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितेने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.