अनिल देशमुख यांची याचिका सुप्रीम कोर्टात दाखल
अनिल देशमुख ईडीसमोर हजर होणार नाहीत असं त्यांचे वकील इंदरपाल सिंह यांनी स्पष्ट केलं. ईडीकडे करणार आहोत. सुप्रीम कोर्टाने आम्हाला CRPC अंतर्गत असलेले उपाय वापरण्याची सूचना केली आहे. त्यामुळे आम्ही कोर्टासमोर याचिका दाखल केली आहे. याचिकेवरील सुनावणी झाल्यावर आम्ही ईडीसमोर हजर राहू, असं सिंह म्हणाले.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
देशमुख यांची मागणी फेटाळताना सुप्रीम कोर्टाने अटकेपासून संरक्षणासाठी "फौजदारी प्रकिया संहितेतील उपायांचा वापर करण्याची सूचना केली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मंगळवारी (17 ॲागस्ट) ईडीने अनिल देशमुख यांना पाचवं समन्स बजावलंय. ईडीने देशमुख यांना बुधवारी चौकशीसाठी हजर होण्यास सांगितलं आहे.
अनिल देशमुख ईडीसमोर चौकशीसाठी आत्मसमर्पण करणार का? त्यांच्यासमोर कोणते कायदेशीर पर्याय उपलब्ध आहेत? हे आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ईडीसमोर त्यांची बाजू मांडणारे वकील इंदरपाल सिंह यांनी "पुढे काय करायचं हे अजूनही ठरवलेलं नाही. पण, त्यांना सरेंडर करावं लागेल," अशी प्रतिक्रिया दिली होती.
अटकेपासून संरक्षण देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
मनीलॉडरिंग प्रकरणी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याला अनिल देशमुख यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.
आपल्याविरोधात कोणतीही अटकेची कारवाई करू नये, अशी मागणी त्यांनी सुप्रीम कोर्टातील याचिकेत केली होती. सोमवारी 16 ॲागस्टला सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुख यांनी मागणी फेटाळून लावत, त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.
अनिल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे म्हणतात, "सुप्रीम कोर्टाने अटकेच्या कारवाईपासून संरक्षणासाठी CRPC म्हणजे Criminal Procedure Code मधील उपायांचा वापर त्या-त्या कोर्टासमोर करण्याची सूचना केली आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.