बारावीचा निकाल जाहीर, 99.63% विद्यार्थी पास
महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचीही उत्सुकता होती. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर केला. यानुसार राज्याचा 12 वी निकाल 99.63 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 4 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थी त्यांचा निकाल https://hscresult.11 thadmission.org.in, https://msbshse.co.in , hscresult.mkcl.org आणि mahresult.nic.in. या वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.
13 लाख 19 हजार 754 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1314965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूणच बारावीच्या परीक्षेचा निकाल 99. 63 टक्के लागला आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिली.
यंदाच्या निकालातही मुलींचीच बाजी
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 99.81 टक्के लागला आहे तर मुलांचा निकाल 99.54 टक्के लागला आहे.
कोणत्या शाखेचा निकाल किती
विज्ञान - 99.45 टक्के,
कला - 99.83 टक्के,
वाणिज्य 99.81 टक्के,
एमसीव्हीसी - 98.8 टक्के विद्यार्थी पास झाले आहेत.
कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वांत कमी
कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.81 टक्के लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वांत कमी म्हणजे 99.34 टक्के लागलेला आहे.
किती टक्के निकाल वाढला?
यावर्षीचा निकाल 8.97 टक्क्यांनी वाढला… विज्ञान मागील वर्षी 96.93 टक्के-यावर्षी 99.45 टक्के, 2.52 टक्क्यांनी जास्त… कला मागील वर्षी 82.63 टक्के यावर्षी 99.45 टक्के, 17.20 टक्क्यांनी जास्त
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.