Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

घरामध्ये पडून राहिलेल्या सोन्यातून मिळवा 2.5 टक्के दराने व्याज

 घरामध्ये पडून राहिलेल्या सोन्यातून मिळवा 2.5 टक्के दराने व्याज



नवी दिल्ली, 19 : भारत हा जगातील सोन्याची सर्वाधिक आयात  करणारा दुसऱ्या क्रमाकांचा देश आहे. आपल्या देशात सोन्याला भावनिक मूल्य अधिक आहे. सोन्यातून नफा मिळवण्याऐवजी अडचणीच्या प्रसंगी गरज पडल्यास त्याचा वापर करता यावा या हेतूनं त्यात गुंतवणुक केली जाते. अडचणीच्या वेळी सोनं विकणं हा सर्वात शेवटचा मार्ग असतो. मात्र सहजसोपा व्यवहार, पूर्वापार चालत आलेला मार्ग म्हणून आजही आपल्या देशात सर्वसामान्य लोकही गुंतवणुकीसाठी सोन्यालाच पसंती देतात. बदलत्या काळात सोन्याच्या गुंतवणुकीतील जोखीम आणि त्रुटी लक्षात आल्यानं तसंच गुंतवणूकीचे अनेक नवीन पर्याय उपलब्ध झाल्यानं गुंतवणुकीसाठी लोक वेगळ्या पर्यायांचा विचार करत आहेत.

गुंतवणूक तज्ज्ञही सोन्याच्या दागिन्यांपेक्षा पेपर गोल्डला प्राधान्य देतात. लोकांचा सोन्यातील गुंतवणुकीवर असलेला विश्वास बघून गोल्ड ईटीएफसारखे अनेक पर्यायही उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील आणखी एक पर्याय आहे तो म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बाँड घरात पडून असलेल्या सोन्यातून व्याजाची कमाई आजच्या काळात घरात दागिने ठेवणं हे अतिशय जोखमीचं आहे. त्यामुळे सुरक्षिततेसाठी दागिने बँकेत लॉकरमध्ये ठेवावे लागतात.

त्यासाठी वेगळे शुल्क भरावे लागते, तसंच हवे तेव्हा दागिने घालण्याची सोय राहत नाही. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांमध्ये पैसे गुंतवून शेवटी ते लॉकरमध्ये ठेवावे लागत असल्यानं दागिने करण्याचा कल कमी झाला आहे. तरीही आपल्या देशात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सोने आयात करावे लागते.

त्यासाठी प्रचंड प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागते. हे लक्षात घेऊन सरकारनं एक अभिनव योजना दाखल केली आहे, ती म्हणजे सॉव्हरेन गोल्ड बाँड. यामुळे घराघरात पडून असलेलं सोनं बाजारपेठेत येईल आणि आयात कमी होईल, अशी अपेक्षा आहे. सोन्याचे दागिने घरात किंवा लॉकरमध्ये ठेवल्यास त्यातून कोणतेही उत्पन्न मिळत नाही.

उलट खर्च आणि जोखीम वाढते. तुम्ही घरात पडून असणारं सोनं BI ने नियुक्त केलेल्या बँकेत जमा करू शकता आणि त्यावर व्याज मिळवू शकता. ही सुविधा भारतीय रिझर्व्ह बँकेच्या  सुवर्ण मुद्रीकरण योजनेअंतर्गत  मिळते. ही बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट सारखीच योजना आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.