Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रुग्णसंख्येच्या आलेखात मोठी वाढ; गेल्या 24 तासात 46 हजार कोरोनाबाधितांची भर तर 607 जणांचा मृत्यू

रुग्णसंख्येच्या आलेखात मोठी वाढ; गेल्या 24 तासात 46 हजार कोरोनाबाधितांची भर तर 607 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली : देशात कोरोना च्या दुसऱ्या लाटेचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयांने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून मंगळवारच्या तुलनेत बुधवारी नऊ हजार रुग्णांची अतिरिक्त वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात 46 हजार 164 रुग्णांची भर पडली असून 607 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात 34 हजार 159 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी देशात 37,593 नव्या रुग्णांची भर पडली होती तर 648 जणांचा मृत्यू झाला होता.

देशातील सध्याची कोरोनास्थिती :

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 25 लाख 58 हजार 530

एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 17 लाख 88 हजार 440

सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 33 हजार 725

एकूण मृत्यू : चार लाख 36 हजार 365

एकूण लसीकरण : 60 कोटी 38 लाख 46 हजार 475 डोस

देशातील कोरोना रुग्णांचा मृत्यू दर हा 1.34 आहे तर रिकव्हरी दर हा 97.68 टक्के आहे. देशातील सक्रिय रुग्णसंख्या ही 0.98 टक्के इतकी आहे.

राज्यातील स्थिती

राज्यात बुधवारी 5031 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 380 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 47 हजार 414 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.04 टक्के आहे.

राज्यात बुधवारी 216 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 35 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 50 हजार 183 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,673 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (41), नंदूरबार (1), जालना (85), परभणी (21), धुळे (17), , हिंगोली (61), नांदेड (34), अमरावती (93), अकोला (21), वाशिम (10), बुलढाणा (34), यवतमाळ (6), नागपूर (97), वर्धा (4), भंडारा (6), गोंदिया (4), गडचिरोली (25) या पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.