Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पृथ्वीराज पाटील फाऊंडेशन, सांगली पूर परिषद - 2021 ठराव

पृथ्वीराज पाटील फाऊंडेशन, सांगली पूर परिषद - 2021 ठराव


1. कृष्णा नदीचा मुख्य प्रवाह कायम ठेवण्यासाठी त्यावरील अडथळे दूर करावेत, तसेच सांगली शहराभोवतीचे पुर्वीचे नैसर्गिक नालेही अडथळेमुक्त करावेत. बफर झोन आणि ब्ल्यू लाईनमध्ये येणारी घरे आणि झोपड्या योग्य ठिकाणी स्थलांतरीत करून त्यांचे पुनर्वसन करावे.  या झोनमध्ये पुन्हा बांधकामे होऊ नेयेत यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करावी.

2. सध्या कमीत कमी कालावधीत प्रचंड पाऊस पडतोय. या बदलत्या पर्जन्यमानाचा नव्याने अभ्यास व्हावा आणि त्यानुसार धरणातील पाणीसाठ्याचे व विसर्गाचे नियोजन व्हावे. केंद्रीय जल आयोगाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे कर्नाटकातील अलमट्टी तसेच महाराष्ट्रातील कोयना, वारणा आणि पंचगंगा या नद्यांवरील धरणांचा पाणी साठा आणि विसर्ग याचा योग्य तो समन्वय ठेवावा. त्याबाबत सतर्कता बाळगावी.

3. पूर काळात सिंचन योजनांचे पंप बंद पडतात, त्यामुळे पुराचे पाणी उचलून दुष्काळी भागात सोडता येत नाही. तेव्हा पूर काळातही पंप सुरू ठेवण्याची सक्षम यंत्रणा उभी करावी.

4. पाऊस आणि पाण्याबाबतचा अंदाज अचूकपणे येण्यासाठी आणि नागरिकांनाही तो समजण्यासाठी रियल टाईम यंत्रणा उभी करण्यात यावी.  कोल्हापूरच्या धर्तीवर जीपीएस बेस्ड इन्फॉरमेशन सिस्टीम चा वापर करावा.

5. पूर परिस्थितीचा अभ्यास करून धोकादायक गावांचे मॅपिंग करण्यात यावे. रेड झोन मध्ये येणा-या गावांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी.

6. पूर काळात जिल्ह्यातील अनेक रस्ते आणि पूल पाण्याखाली जातात.  त्यामुळे शहरांचा आणि गावांचा संपर्क तुटतो.  तेव्हा  संपर्कासाठी असलेल्या महत्वाच्या रस्त्यांची, पुलांची उंची तातडीने वाढवावी.  सांगली शहराजवळच्या बायपास पुलापासून माधवनगर रस्त्यापर्यंत फ्लायओव्हर बांधण्यात यावा.

7. नदी, नाले, गटारी यामधून साचणारे प्लॅस्टिक पुराचा धोका आणखी वाढवते. त्याकरिता प्लॅस्टीक बंदी सक्तीची करावी.

8. बाजारपेठेबद्दल दिर्घकालीन धोरणात्मक निर्णय व त्यासाठी आर्थिक तरतूद करावी. सांगलीसाठी स्वतंत्र आपत्ती प्रबोधन यंत्रणा उभारण्यात यावी.

9. प्रत्येक वर्षी पूर नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करणे आवश्यक आहे. (कृष्णा खोरे पूर प्राधिकरण)

10.  हवामान बदलाचा वेग दुपटीने किंबहूना त्यापेक्षा जास्त झाल्यामुळे त्याचा सामना करण्यासाठी क्षमता निर्माण करणे.

11. परिस्थितीवर नियंत्रणासाठी लोकांमध्ये अवेरनेस आणणे आवश्यक आहे. तसेच त्याबाबत साक्षरता निर्माण करणे.

12. नदीपात्रामध्ये साचलेला गाळ कमी करणे.

13. नदीचे मूळ पात्रात संकुचित ठिकाणी विस्तारीकरण करणे आवश्यक आहे. 

14. नदीवरील वळणे कृत्रिमरीत्या कमी करणे आवश्यक आहे.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.