Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर 20 ऑगस्ट रोजी आशा महिलांची जोरदार निदर्शने

महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेसमोर 20 ऑगस्ट रोजी आशा महिलांची जोरदार निदर्शने 


सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नायर यांनी आशा व गटप्रवर्तक यांच्या  जिल्हा लेवलवरील सर्व मागण्या मंजूर करून आशा महिलांना दिलासा दिला. श्री नायर यांनी सांगितले की (१)सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या फंडामधून जिल्ह्यातील सर्व 850 आशा महिलांना प्रत्येकी एक हजार रुपये  कोविढ 19 चे काम केल्याबद्दल एप्रिल व मे 2029 महिन्याचा  प्रोत्साहन भत्ता आठ दिवसात देण्यात येईल.

दोन) ज्या महिलांना आरोग्यवर्धिनी चे काम करून हि दरमहा एक हजार रुपये चा स्वतंत्र मोबदला मिळाला नसेल तो मोबदला त्यांना देण्यात येईल. (तीन)  लाभार्थी महिलांच्या पैकी ज्यांचा नैसर्गिक गर्भपात होईल त्यांच्या संपर्कासाठी आशांना दीडशे रुपये देण्यात येईल. (४) आशा महिलांना दिवाळीपूर्वी पाचशे रुपये भाऊबीज भेट देण्यात येईल. आयटक संघटनांच्या ज्या ईतर मागण्या आहेत उदाहरणार्थ आशा व गटप्रवर्तक महिलांना कायम कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा व त्यांना दरमहा एकवीस हजार रुपये किमान वेतन मिळावे याबाबतचे निवेदन  शासनाकडे पाठवून देण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले. मंडळांमध्ये युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉ सुमन पुजारी, राखी परब, मोनिका डोन्टस, तृप्ती देसाई,  शुभदा वरद, मयुरी यादव इत्यादींचा समावेश होता. या आंदोलनामध्ये युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड शंकर पुजारी सोनाली नारांगिकर अर्चना रेडकर अनुष्का राखी परब मृण्मयी धोलंम इत्यादींचाही समावेश होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.