Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना: दिवसाला 2 रुपये गुंतवा, म्हातारपणी मिळवा 36 हजारांची पेन्शन

 पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना: दिवसाला 2 रुपये गुंतवा, म्हातारपणी मिळवा 36 हजारांची पेन्शन

आयुष्यातील उतारवयात प्रत्येक व्यक्तीचे जीवन सुरक्षित असणे तसेच आर्थिक आधार मजबुत असणे आवश्यक आहे. यामुळेच निवृत्ती वेतन हा वयोवृद्धांसाठी सर्वात मोठा आधार मानला जातो. यासाठीच केंद्र सरकार अनेक निवृत्तीवेतन योजनांची सोय वयोवृद्धांसाठी करते. याच पर्श्वभूमीवर केंद्राने पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेची सुरुवात केली आहे. या योजने अंतर्गत तुम्ही दर दिवसाला फक्त 1 रुपया 80 पैसे जमा करुन म्हातारपणी वर्षाला तब्बल 36 हजार रुपयांची पेन्शन प्राप्त करु शकतात.

2019 सालापासून केंद्राने या योजनेची सुरुवात गरजू लोकांच्या मदतीसाठी केली आहे. तसेच आगामी काळात 10 कोटी कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा हे उद्धिष्ट डोळ्यांसमोर ठेवून सरकार कार्य करत आहे. केंद्रा सरकारने ही योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी काढली असून 40 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या तसेच मासिक उत्पन्न 15 हजार रुपये असलेला व्यक्ती पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेतून व्यक्तीला त्याच्या उतारवयात महिन्याला 3 हजार रुपयांची पेन्शन मिळू शकते.

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेतील नियम व अटी

केंद्र सरकारने या योजने अंतर्गत काही अटी व नियमावली लागू केल्या आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्तीचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांच्या आत असावे. तसेच संघटित क्षेत्रातील भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना किंवा राज्य कर्मचारी विमा निगम या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत पैसे गुंतवता येणार नाहीत. व्यक्तीचे वय 18 ते 40 वयोगटात असणे आवश्यक आहे. विशेषत: चांभार, शिंपी, रिक्षाचालक, धोबी आणि मजूरवर्ग या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

कशी कराल गुंतवणूक-

वयाच्या 18 वर्षापासून दरमाह 55 रुपये आणि 29 व्या वर्षापासून महिन्याला 100 रुपये गुंतवणूक करणे तसेच 40 वर्षाच्या व्यक्तीने महिन्याला 200 रुपये जमा करणे आवश्यक आहे. तसेच पेन्शनचा लाभ घेण्यापुर्वीच एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर 50 टक्के हिस्सा त्याच्या पती किंवा पत्नीला देण्यात येईल.

कागदपत्रे-

पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी वक्तीजवळ त्याचे आधार कार्ड, जनधन खाते आणि मोबाईल नंबर या तीन गोष्टी असणे आवश्यक आहे. तसेच जीवन विमा निगम (LIC) ची शाखा, राज्य कर्मचारी विमा निगम (ईएसआईसी) किंवा ईपीएफओमध्ये जाऊन संबधित व्यक्ती योजनेची संपुर्ण माहिती मिळवू शकतात आणि योजनेसाठी अर्ज भरु शकता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.