Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

रिझर्व्ह बँकेचा 'या' सहकारी बँकेला दणका; नियम मोडल्याने ठोठावला 15 लाखांचा दंड

 रिझर्व्ह बँकेचा 'या' सहकारी बँकेला दणका; नियम मोडल्याने ठोठावला 15 लाखांचा दंड


मुंबई: अलीकडच्या काही वर्षांमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक नियम कठोर केल्याने अनेक बँकांना दंड ठोठावल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यामध्ये आता हिमालच प्रदेशातील भगत शहरी सहकारी बँकेची  भर पडली आहे. या बँकेने अनुत्पादित मालमत्तेसंबंधीच्या  नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी RBI ने बँकेला 15 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय, दिल्ली नागरिक बँकेलाही रिझर्व्ह बँकेकडून दणका देण्यात आला आहे. या बँकेला एक लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंजाब अँड सिंध बँकेला  25 लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. पंजाब अँड सिंध बँकेला ने रिझर्व्ह बँकेच्या सायबर सुरक्षा नियमावलीचे पालन केले नाही. 16 आणि 20 मे रोजी बँकेला याबाबत सूचित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही बँकेने निष्काळजीपणा सुरुच ठेवल्याने RBI ने दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच बँकेला कारण द्या नोटीसही बजावण्यात आली होती.

सारस्वत आणि एसव्हीसी सहकारी बँकेवर कारवाई

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी देशातील चार बड्या सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये मुंबईतील सारस्वत सहकारी बँक  आणि एसव्हीसी सहकारी बँकेचा  समावेश आहे. रिझर्व्ह बँकेने या दोन्ही बँकांना अनुक्रमे 25 लाख आणि 37.50 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर उर्वरित दोन बँकांमध्ये आंध्र प्रदेशातील महेश को-ऑपरेटिव अर्बन बँक आणि अहमदाबादच्या मर्केंटाइल को-ऑपरेटिव बँकेचा समावेश आहे. यापैकी महेश को-ऑपरेटिव अर्बन बँकेला 1 कोटी 12 लाख 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर मर्केंटाइल सहकारी बँकेला 62.50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

यापूर्वी महाराष्ट्रातील तीन सहकारी बँकांवर कारवाई

काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेने राज्यातील तीन सहकारी बँकांना दंड ठोठावला होता. यापैकी मोगावीरा सहकारी बँकेला 12 लाख, इंदापुर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला  10 लाख आणि बारामती सहकारी बँक लिमिटेडला  एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तत्पूर्वी रिझर्व्ह बँकेने नियमांचे पालन न केल्याप्रकरणी गुजरातमधील ध्रांगधरा पीपल्स को-ऑपरेटिव बँकेला दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. याशिवाय, बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँकेलाही रिझर्व्ह बँकेने 6 कोटींचा दंड ठोठावला होता.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.