जिल्ह्यात कोरोना निर्बंधामध्ये शिथिलता - दुकाने, मॉल, उपारगृहे, जिम्नॅशिअम,योग सेंटर, सलून-स्पा, रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी - सिनेमागृहे, मल्टीप्लेक्स, धार्मिक स्थळे बंद
सांगली, दि. 12,: कोरोणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडील दिनांक 11 ऑगस्ट 2021 च्या मार्गदर्शक सूचनांनूसार जिल्ह्यातील विविध घटकांना शिथिलता देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
जिल्ह्यात दिनांक 15 ऑगस्ट 2021 पासून ज्या विविध घटकांना देण्यात आलेली शिथिलता पुढीलप्रमाणे
1. उपहारगृहे खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 % क्षमतेने खालील अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून सुरु करण्याची मुभा देणेत येत आहे.उपहारगृह / बार मध्ये प्रवेश करताना, प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यंतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील व याबाबतच्या स्पष्ट सूचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील.
ब. उपहारगृह / बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील व ज्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहे असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह / बारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.
क. वातानुकुलीत उपहारगृह / बार असल्यास, वायुविजनासाठी खिडक्या असल्यास कमीत कमी दोन खिडक्या किंवा दरवाजा उघडा ठेवून आतील हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावणे आवश्यक आहे.
ड. प्रसाधनगृहातही उच्च क्षमतेचा एक्झॅास्ट फॅन असणे आवश्यक राहील.
इ. उपहारगृह / बारमध्ये विहित शारीरिक अंतराचे पालन होईल यानुसारच आसन
व्यवस्था करण्यात यावी.
फ. उपहारगृह / बारमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था असणे
आवश्यक राहील.
वरीलप्रमाण उपहारगृह, बार सुरु ठेवण्यास सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह, बारमधील भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी जास्तीत जास्त रात्री 09.00 वाजेपर्यंत घ्यावी. मात्र पार्सल सेवा 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
2. दुकाने जिल्ह्यातील सर्व व्यापारी दुकाने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहील.
3. शॉपिंग मॉल्स - जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचेही कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेवून 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहित ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.
4. जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून-स्पा वातानुकुलीत तसेच विनावातानुकुलीत जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून-स्पा 50 % क्षमतेने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, उक्त संस्था वातानुकुलीत असल्यास, वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील.
5. इनडोअर स्पोर्टस असलेल्या ठिकाणी खेळाडूंचे व तेथील कर्मचारी व व्यवस्थापन यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवस झालेले असणे आवश्यक राहील. तसेच, या ठिकाणी हवा खेळती राहण्यासाठी योग्य वायुविजन व्यवस्था असणे आवश्यक राहील. या ठिकाणी खेळाडूंना बॅडमिंटन, टेबलटेनिस, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशाच खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा देण्यात येत आहे.
6. कार्यालय / औद्योगिक / सेवाविषयक आस्थापना u
अ. सर्व शासकीय / निमशासकीय आस्थापनांचे कर्मचारी, बँक कर्मचारी, रेल्वे व म्युनिसिपल कर्मचारी व व्यवस्थापन यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण प्राथम्याने पूर्ण करण्यात यावे.
ब. ज्या खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कर्मचाऱ्यांचे व व्यवस्थापनांचे कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झालेले असेल त्या आस्थापनांना पूर्ण क्षमतेने सुरु
ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे.
क. सर्व आस्थापनांनी गर्दी टाळण्यासाठी शक्यतो विविध सत्रात कर्मचाऱ्यांना बोलावून कामाचे व्यवस्थापन करावे ज्या आस्थापना वरील कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे अशा सर्व आस्थापनांच्या व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा द्यावी कार्यालयात काम करणे आवश्यक असल्यास कर्मचाऱ्यांचा गर्दीच्या वेळी प्रवास टाळणे शक्य होईल अशा प्रकारे कार्यालयीन वेळेचे व्यवस्थापन करण्यात यावे.
ड. तसेच खाजगी कार्यालयांना वेळेचे व्यवस्थापन करण्यासाठी कार्यालये 24 तास सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. मात्र अशा सत्र व्यवस्थापनांतर्गत कार्यालयांना एका सत्रात कार्यालयातील एकूण कर्मचारी संख्येच्या 25 % उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहतील.
7. जिल्ह्यातील सर्व मैदाने, उद्याने स्थाेनिक प्राधिकरणाने विहीत केल्या्नुसार त्यांनच्या नियमित वेळेत सुरू राहतील.
8. विवाह सोहळे
अ) खुल्याल प्रांगणातील / लॉन वरील किंवा बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे संबंधित प्रांगण / लॉन / मंगल कार्यालय / हॉटेल मधील आसन व्यमवस्थेयच्यास 50 % क्षमतेने व कोविड प्रतिबंधात्मॉक उपाययोजनांचे संपूर्ण पालन होईल या अटीवर मंगल कार्यालयाच्या प्रयोजनार्थ सुरू ठेवण्या ची मुभा देण्यामत येत आहे.
ब) खुल्या प्रांगण / लॉन मध्येी होणा-या विवाह सोहळ्यास उपस्थितांची संख्याध प्रांगण किंवा लॉन 50 % परंतु जास्तीगत जास्तॉ 200 व्य क्ती् या मर्यादेत असेल
क) बंदिस्तप मंगल कार्यालय / हॉटेलमध्येा उपस्थितांची संख्या क्षमतेच्याे 50 % परंतु जास्तीलत जास्तं 100 व्यक्ती या मर्यादित असेल.
ड) मात्र कोणत्या ही परिस्थितीत कोविड प्रतिबंधात्मधक उपाययोजनांचे पालन केले जात आहे याची खातरजमा करण्या्साठी व्हिडीओ रेकॉर्डिंग करणे व आवश्यिकतेनूसार सक्षम प्राधिका-याला तपासणीसाठी उपलब्धॉ करून देणे आवश्यधक राहिल. या निर्बंधाचे उल्लं घन करण्यास-यांवर तसेच संबंधित हॉटेल / कार्यालयांवर दंडनीय कावाई तसेच संबंधित हॉटेल / मंगल कार्यालयाचा परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यासत येईल.
इ) तसेच मंगल कार्यालय / हॉटेल / लॉन व्यवस्थापन / भोजन व्यउवस्था पन / बॅंडपथक / भटजी फोटोग्राफर्स अशा विवाह व्यणवस्थेचशी संबंधित सर्व संलग्नल संस्था यामधील व्यीवस्थाअपक व कर्मचारी यांचेही कोविड प्रतिबंधात्मरक लसीकरण पुर्ण होवून दुसरी मात्रा घेतल्यासनंता 14 दिवस पुर्ण होणे अनिवार्य राहिल व त्यापनुसार ओळखपत्रासह लसीकरण प्रमाणपत्र सोबत असणे आवश्य4क राहील
9. सिनेमागृहे व मल्टिप्ले क्सह जिल्ह्यातील सिनेमागृह / नाट्यगृह, मल्टिप्लेाक्स ( स्वातंत्र तसेच शॉपिंग मॉलमधील ) पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
10. धार्मिक स्थळे जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील आदेशापर्यंत नागरिकांसाठी बंद राहतील.
11. आंतरराज्य प्रवास ज्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाले आहे त्या नागरिकांस, बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नसेल. अन्य प्रवाशासाठी 72 तास पूर्वीची आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह किंवा 14 दिवस विलगीकरण आवश्यक राहील.
12. कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात गर्दी व्यवस्थापन करण्याबाबत केंद्र शासनाने तसेच मा.सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे. यास्तव गर्दी / जमाव टाळण्यासाठी वाढदिवस, राजकीय, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम, निवडणूक प्रचार, सभा, रॅली, मोर्चे इ. वरील निर्बंध कायम राहतील.
13. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना जसे कि, मास्कचा वापर, हातांची स्वच्छता, शारीरिक अंतराचे पालन, इतरत्र थुंकण्यास प्रतिबंध, इ. सर्व निर्बंधांचे पालन करणे अनिवार्य राहील.
14. सर्व दुकाने कार्यालये, औद्योगिक आस्थापना, उपहारगृहे, बार व मॉल मालक / व्यवस्थापनाने त्यांचे आस्थापनेवर कार्यरत असलेल्या व्यवस्थापक तसेच कर्मचाऱ्यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण होवून 14 दिवस झाल्याची खातरजमा करावी व या कर्मचार्यांची यादी (लसीकरण माहिती / प्रमाणपत्रासह) तयार ठेवावी व सक्षमप्राधिकाऱ्यानी तपासणी साठी मागणी केल्यास त्यांना उपलब्ध करून द्यावी.
15. दुकाने / उपहारगृहे / बार / मॉल्सचे / कार्यालये औद्योगिक आस्थापना यांचे नियतकालीक निर्जंतुकिकरण व सॅनिटायझेशन करण्याची जबाबदारी सबंधित मालकाची व व्यवस्थापनाची असेल, तसेच, यामध्ये कर्मचारी तसेच ग्राहकांचे तापमान घेण्यासाठी इन्फ्रारेड / कॉन्टॅक्टलेस थर्मामिटर याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच यामध्ये मास्क डिस्पेसर व बायोमेडिकल वेस्ट (वापरलेले मास्क व टिशु पेपर्स इत्यादीची विल्हेवाट) जमा करण्याची व विहित कार्यपद्धतीने विल्हेवाटीसाठी देण्याची जबाबदारी सबंधित आस्थापनांची असेल.
सदर आदेशामध्ये समाविष्ट नसलेल्या बाबींसाठी यापुर्वी पारित केलेला आदेश लागू असेल.
सदर आदेशामध्ये सूट देणेत आलेल्या आस्थापनांना यापूर्वी राज्यशासनाकडून, जिल्हा प्रशासनाकडून कोव्हीड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे ,निर्देशांचे पालन करणे बंधनकारक राहील.
सदर आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी.
सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार गुन्हे दाखल करणेकामी सांगली जिल्ह्यातील सबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना या आदेशाद्वारे प्राधिकृत करणेत येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.